मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत कान्हेगाव शाळेचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत कान्हेगाव शाळेचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

श्रीरामपूर(वेबटीम)  नुकत्याच झालेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगावच्या आठ विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय गुणव...

श्रीरामपूर(वेबटीम)



 नुकत्याच झालेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगावच्या आठ विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावला आहे . कान्हेगाव ही श्रीरामपूर तालुक्यातील द्विशिक्षकी शाळा असून दरवर्षी केंद्रस्तरीय तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा असो किंवा क्रिडा स्पर्धा विविध स्पर्धा परीक्षा यात कान्हेगाव शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 

यावर्षी एकाच वेळेस इयत्ता चौथीचे पाच आणि इयत्ता तिसरीचे तीन विद्यार्थी असे एकूण आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊन त्यांनी इतिहास घडविला आहे. इयत्ता चौथीतील अमृता ज्ञानेश्‍वर चौधरी द्वितीय, पूर्वा प्रकाश खरात तृतीय, निखिल बाळासाहेब खरात चतुर्थ, ईश्वरी प्रमोद खरात आठवी, विश्वजीत अशोक चौधरी चौदावा, इयत्ता तिसरीतील कुमार अरुण खरात चतुर्थ, साईनाथ विवेकानंद खरात नववा, आराध्या निलेश खरात दहावा क्रमांक गुणवत्ता यादीत मिळवला आहे. 

या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका रेहाना मुजावर शेख, मुख्याध्यापिका वैशाली थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पढेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख राजूभाई इनामदार, शिक्षण विस्तार अधिकारी मंगल गायकवाड, संजीवन दिवे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक, सर्व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांवर  अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत