राहुरी शहरातील वाईन शॉपला भीषण आग, मोठे नुकसान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरातील वाईन शॉपला भीषण आग, मोठे नुकसान

  राहुरी(वेबटीम) राहुरी शहरातील नगर मनमाड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील मोटवानी वाईन्सच्या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून कोट्याव...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी शहरातील नगर मनमाड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील मोटवानी वाईन्सच्या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून कोट्यावधीचे नुकसान झाले  आहे .


आज दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे चालक जसविंदर कथुरिया व कामगार नेहमी प्रमाणे वाईन शॉपी उघडण्यासाठी आले असता त्यांनी वाईन शॉपी उघडताच आतून धुराचा लोळ बाहेर पडला प्रसंगावधान राखत जसविंदर कथुरिया यांनी तात्काळ राहुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधत अग्निशामन दलाचे प्रमुख राजेंद्र पवार यांना फोन करून घटनेची माहिती कळवली.


 अग्निशामक दलाचे  प्रमुख राजेंद्र पवार यांनी तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दल पाठवून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.परंतु गोडाऊनला ही आग लागली असल्या कारणाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे अग्निशामक दलाचे  प्रमुख राजेंद्र पवार ,नंदू मोरे ,लखन काळे, अमोल गिरगुणे ,बाळासाहेब पवार यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत