पानेगांव (वार्ताहर) नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे ३८शिर्डी लोकसभा मतदान शांततेत पार पडले. एकुण १८७९ मतदारांपैकी १२४६ मतदारांनी हक्क बजाव...
पानेगांव (वार्ताहर)
नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे ३८शिर्डी लोकसभा मतदान शांततेत पार पडले. एकुण १८७९ मतदारांपैकी १२४६ मतदारांनी हक्क बजावला सकाळी ९वाजेपर्यंत अवघे ७%मतदान झाले होते. दुपारनंतर मतदान करण्यासाठी महिला तसेच पुरुषांनी गर्दी केली होती.दोन बुथा मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली क्र. ७८बुथ मध्ये निवडणूक अधिकारी गोडसे पी.एस तर क्र.७९ मध्ये ढमाले एन एस होते. एकुण निवडणूक प्रक्रिया मध्ये नेवासे तहसीलदार डॉ संजय बिरादार , सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अशिश शेळके,नायब तहसीलदार तथा निवडणूक विभागाचे किशोर सानप, यांचा मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक,तालुका आरोग्य, महसूल प्रशासनातील तलाठी, मंडल अधिकारी, अंगणवाडी सेविका,अशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी सह १२ कर्मचारी उपस्थित होते.
लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे, वंचित कडू उमेदवार उत्कर्षा रुपवते सह अन्य २०उमेदवार नशीब अजमावत आहे.
पानेगांवात मतदान करण्यासाठी ग्रामपंचायत जनजागृती तसेच घरोघरी जाऊन मतदान हक्क बजावण्यासाठी विशेष मोहीम लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले, उपसरपंच दत्तात्रय घोलप ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे,कर्मचारी गायकवाड,शेंडगे,चिंधे तसेच मतदान केंद्रावर अपंग व्यक्तींना स्टेचर सायकल पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत