कोपरगावचा सोमवार १३ मेचा आठवडे बाजार बंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावचा सोमवार १३ मेचा आठवडे बाजार बंद

कोपरगाव (वेबटीम)  १३ मे रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत असून याच दिवशी सोमवारी कोपरगावचा आठवडे बाजार असल्याने यो बंद ठेवण्यात आला ...

कोपरगाव (वेबटीम)



 १३ मे रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत असून याच दिवशी सोमवारी कोपरगावचा आठवडे बाजार असल्याने यो बंद ठेवण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी सांगितले


 याबाबत बोलताना जगताप म्हणाले की, कोपरगाव शहरातील आठवडे बाजारातील भाजी, फळ, किराणा, रेडीमेड, कापडे व इतर अनुषंगिक व्यापारी यांना कळविण्यात येते की, ३८-शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सदर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्याचे दृष्टीने ज्या गावांमध्ये मतदानाचे दिवशी म्हणजे सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी आठवडे बाजार आहे, अशा ठिकाणचे बाजार बंद ठेवणेकामी मा. उपविभागीय अधिकारी, शिर्डी, भाग शिर्डी यांचे दि. १० मे २०२४ रोजी आदेश प्राप्त झालेले आहे. सदरील आदेशानुसार मतदान प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्याचे दृष्टीने सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्यात येत आहे, याची सर्व आठवडेबाजार विक्रेते यांनी नोंद घ्यावी.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत