कोपरगाव / प्रतिनिधी शहरातील नमस्वी सचिन कुलकर्णी या चिमुकलीने येत्या सोमवारी (ता.13) शिर्डी लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानासाठी आवर्जून जाऊन मतदा...
कोपरगाव / प्रतिनिधी
शहरातील नमस्वी सचिन कुलकर्णी या चिमुकलीने येत्या सोमवारी (ता.13) शिर्डी लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानासाठी आवर्जून जाऊन मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले आहे. याबद्दल तिचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी कौतुक केले आहे.
नमस्वी भावबंध वधु-वर सूचक मंडळ संस्था गेल्या तीन वर्षांपासून विविध उपक्रम राबवले आहे. या उपक्रमात अनाथ, दिव्यांग व्यक्तींना नित्य अन्नदान सेवा व रुग्णसेवा याचबरोबर मकरसंक्रांतीनिमित्त पतंगाच्या नायलॉन मांजावर बंदी, दीपावली फराळ वाटप असे विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमात यंदा नवीन उपक्रमाची भर पडली आहे. राष्ट्रीय निवडणूक होणार असल्याने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी वाया न घालवता मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य निभवावे मग सुट्टीचा आनंद घ्यावा, असा संदेश चिमुकली मुलगी नमस्वी सचिन कुलकर्णी ही शासकीय कार्यालये व रहदारीच्या ठिकाणी देत आहे. याबद्दल तिचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, सहायक उपनिरीक्षक महेश भामरे, श्री. ठोंबरे, श्री. पावरा आदींनी कौतुक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत