राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी:- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुरी फॅक्टरी येथील चैतन्य उद्यो...
राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी:-
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुरी फॅक्टरी येथील चैतन्य उद्योग समूहाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी त्यांचे स्वागत करून सन्मान केला.
प्रसंगी ना. आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली 'जरी नाही मिळाली मला उमेदवारी तरी इकडे चालू राहील माझी वारी' अशी कविता सादर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
प्रसंगी आरपीआयचे नेते विजय वाकचौरे, संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव,बाळासाहेब गायकवाड,जित रामदास आठवले, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत जाधव,जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे, शिवसेना शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष किशोर मोरे, शिवसेना तालुकाध्यक्ष सुनील कराळे, अन्वर शेख,अकिल शेख, सोमा भागवत, ताराचंद जाधव,दिशान शेख,अरविंद वाघ आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत