राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौकात उद्या रविवारी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौकात उद्या रविवारी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार १९ मे रोजी  सायंकाळी ६ वाजता भव्य जिल्हास्तरीय नृत...

राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी



राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार १९ मे रोजी  सायंकाळी ६ वाजता भव्य जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील उदयोन्मुख कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी वाव मिळावा या हेतूने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने ही नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे.


 या स्पर्धेसाठी सामूहिक नृत्य गटास प्रथम पारितोषिक ११००१ रु. मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ शशिकांत संसारे, द्वितीय पारितोषिक ७००१ रुपये मुंबई येथील पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सामूहिक नृत्य लहान गट प्रथम पारितोषिक ७००१ रुपये सत्यजित कदम फाउंडेशचे अजित चव्हाण व भारत शेटे यांच्याकडून  द्वितीय पारितोषिक ५००१ रुपये अनिल डोळस यांच्याकडून दिली जाणार आहेत. सोलो नृत्य मोठा गट प्रथम पारितोषिक ७००१ रुपये साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, द्वितीय पारितोषिक इलेक्ट्रिकलचे अमोल तुरकणे, प्रशांत डुक्रे,संदीप निभे तर तृतीय पारितोषिक ४००१ ऋषिकेश इंटरपायजेस चे निखिल कुऱ्हाडे यांच्याकडून सौजन्य केली जाणार आहे.

सोलो नृत्य लहान गटास प्रथम पारितोषिक ५००१ हारून पठाण, द्वितीय पारितोषिक ४००१ रुपये स्वराज्य उद्योग समूहाचे अध्यक्ष किशोर गडाख, तृतीय पारितोषिक ३००१ रुपये कदम पेंट्स चे प्रसाद व सचिन कदम तर चतूर्थ २५०१ रुपये साई अर्णव सॉमिलचे जालिंडर दोंड यांच्याकडून दिली जाणार आहे.विशेष पारितोषिक सौजन्य आंबिका स्टोन क्रेशरचे मयुर भोसले व साई स्टोन क्रेशरचे अजय गोसावी व आदिनाथ कडू यांनी केले आहे.


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी ७७०९०३७७५०, ९६६५९१९९३३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत