राहुरी(प्रतिनिधी) 33 वर्षानंतर त्याच शाळेचे प्रांगण एकमेकाला बघताना व त्यांची विचारपूस करताना डोळ्यातून आलेले आनंदाश्रू एकमेकांच्या कुटुंबाब...
राहुरी(प्रतिनिधी)
33 वर्षानंतर त्याच शाळेचे प्रांगण एकमेकाला बघताना व त्यांची विचारपूस करताना डोळ्यातून आलेले आनंदाश्रू एकमेकांच्या कुटुंबाबद्दल जिव्हाळ्याने विचारणार त्याचबरोबर शाळेत असतानाच्या आठवणींना उजाळा अशा भारवलेल्या वातावरणामध्ये देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचा स्नेह भेट मेळावा पार पडला.
याबाबत माहिती अशी की,तब्बल ३३ वर्षांनतर एकत्र आलेल्या देवळाली प्रवरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्नेहभेट सोहळा उत्साहात संपन्न झाला. अनेक वर्षानंतर भेटल्यानंतर शाळेतील आठवणींना उजाळा देण्यात आला.
सन १९९१ व १९९२ साली देवळाली प्रवरा (ता.राहुरी) येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा १०० मुले व मुली सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आली. मुला-मुलींच्या चर्चेतून सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. नियोजनानुसार सर्व मुल-मुली छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात एकत्र जमा झाले.
यावेळी भारत मातेचे यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. प्रारंभी प्रास्तविक गणेश विघे यांनी केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक गोकुळदास साळुंके सर होते. यावेळी शिक्षक शिवाजी हरिश्चंद्रे सर, अरुण कुलकर्णी सर, श्री ढगे सर, श्री.कुलट सर, श्री गागरे सर श्री लोखंडे सर श्री शेळके सर श्रीमती उदमले मॅडम विद्यालयाचे प्राचार्य श्री कडूस सर आदी उपस्थित होते. यावेळी स्वतःची ओळख करून देत सर्वानी शाळेतील आठवणी कथन केल्या.
शासकीय क्षेत्रात उच्च पदावर काम करणारे, उद्योग, शेती क्षेत्रात भरारी घेतलेले, पोलिस, महसूल, कृषि, विद्यापीठ, डॉक्टर, इंजिनीयर, वकील, राजकीय क्षेत्र, पत्रकारीता, खाजगी कंपन्या, उद्योग व्यवसायात सर्व मित्र मैत्रिणी आपल्या जीवनात व्यस्त असताना एक दिवस पुन्हा विद्यार्थी जीवनातील काळाचा अनुभव घेण्यासाठी आयोजित केलेला स्नेहभेट कार्यक्रमांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एकत्रित जमल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षकांना सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी तर आभार दुर्गा दराडे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब होले, डॉक्टर भागवत वीर, राजेंद्र कदम, रंगनाथ मुसमाडे, किरण चव्हाण, किशोर तोडमल, रवींद्र दरंदले, अंजली गंगवाल, विद्या दिमोटे, कल्याणी कदम, नयना निकम,यांच्यासह अनेक सहकारी मित्रांनी विशेष प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत