राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) देवळाली प्रवरा गायत्री उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एचएससी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, विद्यार...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
देवळाली प्रवरा गायत्री उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एचएससी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी याही वर्षी विद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यालयातील कुमारी सरोदे ज्ञानेश्वरी सोमनाथ या विद्यार्थिनीने 88% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच गीते मयूर पवन या विद्यार्थ्याने 82.30% गुण मिळवून विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तांबे प्रणव महेश या विद्यार्थ्याने 82.2% गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवला आहे.
विद्यालयातील सरोदे ज्ञानेश्वरी सोपान या विद्यार्थिनीने फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयात अनुक्रमे 94, 87 आणि 95 गुण मिळवले असून, तांबे प्रणव महेश या विद्यार्थ्याने बायोलॉजी विषयात 93 गुण मिळवले आहेत. तसेच विषयानुसार, गणित या विषयामध्ये खांदे गौरी बाबासाहेब या विद्यार्थिनीला 92, चव्हाण अंजली अरुण या विद्यार्थिनीने 91 गुण मिळवले, तांबे प्रणव महेश 87, शेटे अभिषेक सुनील, पाटील गायत्री विठ्ठल, कोबरणे कार्तिकी विलास या विद्यार्थ्यांना गणित विषयात 86 गुण मिळाले आहेत. बायोलॉजी या विषयात लगदे संकेत बाबासाहेब या विद्यार्थ्याला 91, वरघुडे नम्रता बाळासाहेब या विद्यार्थिनीला 87 गुण मिळाले, खांदे गौरी बाबासाहेब 85 गुण मिळाले आहेत. तर IT या विषयात वरखडे ऋतुजा गणेश या विद्यार्थिनीला 95, माळवदे सत्यम रामचंद्र या विद्यार्थ्याला 93, झावरे सार्थक रामेश्वर या विद्यार्थ्याला 92 गुण मिळाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा डॉ. सौ. गीता राऊत, सचिव प्रा. सतीश राऊत, संचालक मच्छिंद्र पा. तांबे, नानासाहेब पा. कदम, प्राचार्य दादासाहेब भोसले, सुधाकर पा. कराळे , रफिक शेख तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत