राहुरी(प्रतिनिधी) तालुक्यातील कणगर येथील चि. अथर्व प्रकाश नवले याने आळंदी येथील श्री सदगुरू निजानंद महाराज वेदविद्यालय येथे वेदविशारद परीक्ष...
राहुरी(प्रतिनिधी)
तालुक्यातील कणगर येथील चि. अथर्व प्रकाश नवले याने आळंदी येथील श्री सदगुरू निजानंद महाराज वेदविद्यालय येथे वेदविशारद परीक्षेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे .
महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे सद्गुरू निजानंद महाराज वेद विद्यालय येथे सुवर्ण मुद्रा परिक्षा प्रतिवर्षी आयोजित केली जाते. शुक्ल यजुर्वेद संहितेमधील अचूक मंत्र पठणबाबत ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये कणगर येथील अर्थव प्रकाश नवले याने हा द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन वेदविशारद परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. अथर्व हा प्रकाश नवले गुरू यांचा मुलगा आहे.अर्थव यास जेष्ठ वेदमुर्ती महेश नंदे, वेदमूर्ती मुकेश दंडवते, वेदमूर्ती भगवान जोशी, वेदमुर्ती विजय भालेराव आदीचे मार्गदर्शन लाभले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत