कोपरगाव(वेबटीम) दि 2/5/2024 पीएमटी हॉस्पिटल लोणी येथील डॉक्टर ओमप्रकाश डांग यांनी फिर्याद दिले वरून बालकाच्या आई-वडिल यांचे विरुद्ध लोणी पो...
कोपरगाव(वेबटीम)
दि 2/5/2024 पीएमटी हॉस्पिटल लोणी येथील डॉक्टर ओमप्रकाश डांग यांनी फिर्याद दिले वरून बालकाच्या आई-वडिल यांचे विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर259/2024 भादवी कलम 317 प्रमाणे दाखल करण्यात आला होता मा Dysp शिरीष वमने यांनी सदर गुन्हयाचे तपासा करिता पथक नेमले सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय व तांत्रिक तपासा द्वारे निष्पन्न झाले की सदरचे आरोपी हे कोपरगाव आणि शिर्डी परिसरात राहत असले बाबत माहिती मिळाल्याने दि 29/05/2024 रोजी सदर आरोपींचा शोध घेत असताना असताना आरोपी क्र १) रमेश गोपीनाथ नरोडे कोपरगाव येथील संजीवनी कॉलेज परिसरात मिळून आला २) यास्मिन उर्फ अश्विनी रमेश नरोडे ही शिर्डी परिसरात कालिका नगर येथे मिळून आली त्यांना त्यांचा मूळ पत्ता विचारता दोघे राहणार छटेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी असे सांगितले की सदरचे बाळ त्यांचेच असून त्यांचे कडे बाळाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी त्यांचे बाळ प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे ऍडमिट करून निघून गेलो असे सांगितले आहे
सदर गुन्हयातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले असून पुढील कारवाई लोणी पोलीस स्टेशन तपसी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मा. श्री वैभव कलूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मा. डीवायएसपी शिरीष वमने शिर्डी उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे HC इरफान शेख HC अशोक शिंदे HC निलेश धादवड महिलाHC पदमा डोलनर चालक HC वरपे pn सचिन शेवाळे व अमोल फटांगरे यांनी केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत