राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील वरखडे वस्तीवरील शोभा जगन्नाथ वरखडे या महिलेचा अयोध्या येथे देवदर्शनासाठी ग...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील वरखडे वस्तीवरील शोभा जगन्नाथ वरखडे या महिलेचा अयोध्या येथे देवदर्शनासाठी गेलेल्या असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की ,वरखडे वस्ती येथील शोभा जगन्नाथ वरखडे त्यांच्या काही नातेवाईक महिला तसेच गावातील अन्य महिला गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी अयोध्या व अन्य ठिकाणी देवदर्शनासाठी गेल्या होत्या काल मंगळवारी चित्रकूट येथे शोभा वरखडे यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले याच वेळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान काल दुपारी ही दुर्दैवी घटना घडली असून रात्री आठ वाजे नंतर चित्रकूट येथील रुग्णवाहिकेद्वारे शोभा वरखडे यांचा मृतदेह महाराष्ट्रात पाठविण्यात आला आज बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह वरखडे वस्ती येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी चार वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत शोभा वरखेडे ह्या प्रगतशील शेतकरी जगन्नाथ वरखडे यांच्या पत्नी तर डॉ. साईनाथ वरखडे व वसंत वरखडे यांच्या मातोश्री आहेत त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत