राहुरी फॅक्टरी येथील "शिवचरित्रकार हसन सय्यद" यांचा दहिवड येथे गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील "शिवचरित्रकार हसन सय्यद" यांचा दहिवड येथे गौरव

नाशिक(वेबटीम)  बुधवार, दि. १ मे २०२४ रोजी, महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक येथील देवळा तालुक्यातील दहिवड या गावांमध्ये "लोकराजा एज्युकेशन ...

नाशिक(वेबटीम)



 बुधवार, दि. १ मे २०२४ रोजी, महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक येथील देवळा तालुक्यातील दहिवड या गावांमध्ये "लोकराजा एज्युकेशन फाउंडेशनचे" एव्हरग्रीन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शुभारंभ राहुरी तालुक्याचे सुपुत्र व महाराष्ट्रातील सुप्रसिध्द राष्ट्रीय शिवचरित्रकार तथा समाजप्रबोधनकार हसन सय्यद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.


त्यानिमत्ताने शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी आपल्या प्रबोधनातून शिवकालीन इतिहासातील शिवरायांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात केलेली अभूतपूर्व क्रांतीचे दाखले देवून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसमोर शिवकालीन शैक्षणिक धोरण कसे होते हे आपल्या प्रबोधनातून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, स्वराज्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यासाठी त्यांना पुस्तके उपलब्ध व्हावे म्हणून शिवाजी महाराजांनी पुस्तके छापण्याचे छपाई कारखाने उघडले, मल्ल विद्या व मैदानी खेळात मुलांनी प्राविण्य मिळवावे म्हणून शिवरायांनी प्रशिक्षण दिले. राज्याचा उध्दार करायचा असेल तर तल्लक व चलाक बुध्दीमत्ता शिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी दूरदृष्टी ठेवून वैज्ञानिक गरुडझेप घेवून रायगडाचे निस्वार्थपणे बांधकाम करणारे सर्वउत्कृष्ठ हिरोजी इंदुलकरांसारखे उत्तम अभियंते तयार केले. आपल्या संवाद रुपी प्रबोधनातून व्याख्येते हसन सय्यद यांनी दहिवड गावातील ग्रामस्थांचे टाळ्यांच्या कडकडाटात मने जिंकली.



दरम्यान "लोकराजा एज्युकेशन फाउंडेशनचे" संस्थापक श्री. ऋषिकेश सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविक  भाषणातून हसन सय्यद यांनी शिवरायांचा प्रेरणादायी इतिहासाचा प्रवास हा महाराष्ट्र पुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या बाहेरही दिल्ली, आग्रा, ग्वालियर येथे शिवरायांच्या शिवकालीन महाराष्ट्र इतिहासाचा प्रचार व प्रसार आपल्या ओघवत्या शैलीत कथन केले आहे, तसेच येणाऱ्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक निमित्त पुन्हा महाराष्ट्रा बाहेर मध्यप्रदेश येथील शिवभक्तांच्या वतीने भोपाळ येथे नियोजित आहे. 

 मुस्लिम समाजातील शिवरायांचा निष्ठावंत मुस्लिम मावळा म्हणून श्री. ऋषिकेश सोनवणे यांनी आपल्या भाषणातून हसन सय्यद यांचे गौरवही केले. व त्यांच्या शिवकार्यास शुभेच्छा दिल्या.


 यावेळी संस्थापक अध्यक्ष व सचिव ऋषिकेश सोनवणे, उपाध्यक्ष केदा अहिरराव, चेअरमन श्री. भाऊराव सोनवणे, व्हा चेअरमन प्रभाकर अहिरराव, व्हा चेअरमन जयाबाई सोनवणे, वसंत कदम,ग्रामपंचायत सदस्य : दिगंबर सोनवणे, दिगंबर पवार, सुनील अहिरराव, माजी पोलिस पाटील मधुकर शिंदे, माजी सोसायटी चेअरमन दादाजी सोनवणे, श्री तुषार सोनवणे ( सिनियर मॅनेजर BOB) , माऊली व परिवार (नाशिक) , अहिरराव मॅडम ( स्कूल को ॲारडिनेटर,नाशिक) , प्रा.भामरे सर व परिवार(सटाणा), देवरे सर, आंबादास ( उमराणे), अकॅडमी चे विद्यार्थी , रुपाली महिरे व प्रज्ञा देवरे परिवार, सोनवणे अहिरराव परिवार, मित्रपरिवार व समस्त दहिवड ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत