शिव उपासनेतून महात्मा बसवेश्वरांचे विचार एकात्मतेचा संदेश देणारे... - महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिव उपासनेतून महात्मा बसवेश्वरांचे विचार एकात्मतेचा संदेश देणारे... - महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज

कोपरगाव(वेबटीम) शिव उपासना करतांना संत महात्मा बसवेश्वर यांनी समाजसुधारक म्हणून सगळे भेद मिटवून सामाजिक समरसतेचे कार्य एकात्मतेचा संदेश देणा...

कोपरगाव(वेबटीम)



शिव उपासना करतांना संत महात्मा बसवेश्वर यांनी समाजसुधारक म्हणून सगळे भेद मिटवून सामाजिक समरसतेचे कार्य एकात्मतेचा संदेश देणारे असल्याचे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी सांगितले. 


अक्षय तृतीया या शुभदिनी संत महात्मा बसवेश्वर यांची जयंती शैव संप्रदाय, लिंगायत, जंगम, गवळी सह महात्मा बसवेश्वर विचारांचे नागरिकांकडून तिथी नुसार साजरी केली जाते. महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करतांना आपल्या प्रत्येकाचे घरी त्यांची प्रतिमा पुजनासाठी असावी या हेतूने माजी सैनिक कै.आर. बी. (रामलिंग बाळाप्पा) तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठाण, कोपरगांव वतीने महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा कौटुंबिक पुजनासाठी आणि शिव उपासनेत महत्त्वाचे मानलेले बेलाचे रोप वितरण प्रभू श्रीरामचंद्र यांनी पावन केलेल्या श्री क्षेत्र राघवेश्वर महादेव देवस्थान येथे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आले.


या प्रसंगी महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज, कुंभारी गावचे  प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले, माजी सैनिक कै.आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठानच्या विश्वस्त रजनीताई नलगे, प्रकाश घोडके, अर्चना घोडके,सुरेश घोडके, दिलीप घोडके,संतोष नलगे,सोमनाथ निळकंठ, सुशांत घोडके,शिवप्रसाद घोडके, आर्यन घोडके, राघवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोपिनाथ निळकंठ, राजेंद्र निळकंठ, ग्रामपंचायत सदस्या कविता निळकंठ, बजरंग दलाचे अध्यक्ष अभिजित चकोर, मुक्ताबाई वाळेकर, शोभा निळकंठ,सोनाली निळकंठ, सोनाली महाजन, सायली नीलकंठ, गीता महाजन,  अतुल निळकंठ, गंगाधर निळकंठ,  जितेंद्र महाजन, आदित्य महाजन, ललित निळकंठ , कार्तिक निलकंठ, संदीप चंद्रकांत निळकंठ , आकाश निळकंठ , अरुण निळकंठ, प्रतीक दिलीप निळकंठ, गणेश गंगाधर निळकंठ , प्रकाश निळकंठ, प्रवीण अशोक निळकंठ,धनंजय निळकंठ,सतीश निळकंठ,अशोक निळकंठ, बाळासाहेब निळकंठ, वाल्मिक निळकंठ ,भारत निळकंठ, योगेश  निळकंठ, रावसाहेब निळकंठ आदींसह कुंभारी येथील निळकंठ परिवार उपस्थित होते. 


माजी सैनिक कै.आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठाण, कोपरगांव वतीने सन २०११ पासून संत रामदासी भक्त सेवा,सैन्यदल विशेष सन्मान,वृक्षारोपण आणि पालकत्व यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या वर्षी ५१ बेल रोपांचे वितरण करुन पालकत्व दिले आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या १०८ प्रतिमा आणि बेल वृक्ष रोप वितरण करण्यास प्रारंभ केला आहे.


आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात भारतातील वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि त्यांचे तत्वज्ञान यांचा अभ्यास केला. व सामाजिक समरसतेची क्रांतीकरून राष्ट्रीय एकतेचा विचार प्रवाह निर्माण केला आहे.बसवेश्वर यांचा जन्म अक्षयतृत्तिया या मुहुर्तावर विजापूर जिल्ह्यात 'बागेवाडी' येथे झाला. शिव हा एक ईश्वर मानून दया, अहिंसा, सत्य, सदाचार, निती आणि शिल हा विचार अंगीकारला व त्यावर प्रबोधनही केले आहे. 'श्रमात स्वर्गीय प्रतिष्ठेचा आनंद आहे' ही शिकवण त्यांनी दिली आहे.गरीब-श्रीमंत, उच्च-निच्च, स्त्री-पुरूष यातील दरी संपुष्टात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आज जगभरात ठिकठिकाणी त्यांचा विचारांचा आदर होत आहे. म्हणून त्यांना 'जगज्योती' असेही संबोधले जात आहे.१२ व्या शतकात अनुभव मंडप संकल्पना प्रत्यक्षात आणून समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांना आपले विचार मांडण्याची व्यवस्था करुन दिली.भारतीय संसद व्यवस्थेची पहिली रचना मानली जाते.शालेय अभ्यासक्रमातील त्यांच्या आदर्श विचाराचा धडा विद्यार्थी शिकतात.अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रधानमंत्री कालखंडात महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा भारताचे संसद भवन प्रांगणात उभारण्यात आला. तसेच महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा मुद्रित केलेले चांदीचे नाणे चलनात आहे.  महात्मा बसवेश्वरांसारख्या थोर क्रांतीकारकांच्या राष्ट्रीय समरसतेच्या विचारांची जयंती राष्ट्रालाही तरुणांना वाटेवर घेवून जाते आहे.


प्रारंभी महंत राघवेश्वरानंदगिरी यांचे संतपुजन करून त्यांचे शुभहस्ते महात्मा बसवेश्वर प्रतिमा अनावरण करण्यात आले. सुत्रसंचालन अतुल निळकंठ यांनी तर आभार सुशांत घोडके यांनी मानले. या विचारशील उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत