देवळाली प्रवरा नगरपरिषदेत 'सेल्फी विथ व्होट स्पर्धा व मतदान स्पर्धा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषदेत 'सेल्फी विथ व्होट स्पर्धा व मतदान स्पर्धा

देवळाली प्रवरा(वेबटीम) वाढत्या उष्णतेमुळे मतदारराजा मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि...

देवळाली प्रवरा(वेबटीम)




वाढत्या उष्णतेमुळे मतदारराजा मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी 'सेल्फी विथ व्होट स्पर्धा'  व 'शहरस्तरीय लोकसभा सार्वत्रिक  निवडणूक २०२४ मतदान स्पर्धा'  आयोजित करून आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. अशी माहिती देवळाली प्रवरानगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली आहे. 
                      
स्पर्धेच्या नियम व अटी  नगरपरिषदेने परिषदेच्या फलकावर लावलेल्या आहेत.  सोशल मिडीयाद्वारे स्पर्धेचा प्रचार व प्रसार नगर परिषद करीत आहे. शहरातील सर्वस्तरावरील नागरिकांनी मतदान करावे. हाच या स्पर्धेचा हेतू असल्याचे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दुर्गादेवी उत्सव मंडळे व्यायाम शाळा सामाजिक संस्था विविध क्लब रहिवाशी कॉलनी, बचत गट यामध्ये सहभागी होऊ शकतात आपल्या परिसरातील जास्तीत जास्त मतदान घडून आणणे हे काम या मंडळांनी करायचे आहे. नगरपालिकेने दिलेल्या लिंकवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व माहिती भरून आपला सहभाग निश्चित करावा. जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत