राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी येथील जैन धर्मस्थानक येथे उद्या शुक्रवार ३१ मे शनिवार १ जून या कालावधीत राष्ट्रसंत आ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी येथील जैन धर्मस्थानक येथे उद्या शुक्रवार ३१ मे शनिवार १ जून या कालावधीत राष्ट्रसंत आचार्ज सम्राट आनंदऋषिजी म.सा यांचे सुशिष्य अर्हम् विज्जा प्रणेता पूज्य गुरुदेव प्रवीणऋषीजी म.सा यांचा प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
३१ मे व १ जून २०२४ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत प्रवचन सोहळा, दुपारी ३ ते ४ या वेळेत धर्म चर्चा व रात्री ८.३० ते ९.३० यावेळेत प्रवचन सेवा आयोजित करण्यात आली आहे.
तरी या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन जैन श्रावक संघ, राहुरी फॅक्टरी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत