राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील आदिनाथ वसाहत येथील महादेव मंदिर परिसरात दारू पितो म्हणून या ठिकाणी दारू पिऊ नको असे समजावुन सांगण्यास गेलेल्या ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील आदिनाथ वसाहत येथील महादेव मंदिर परिसरात दारू पितो म्हणून या ठिकाणी दारू पिऊ नको असे समजावुन सांगण्यास गेलेल्या तरुणास प्रसादनगर येथील एकाने तोंडावर हातातील कडयाच्या साह्याने फटका मारून जखमी केल्याप्रकरणी राहुरी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कल्पक धावडे याने राहुरी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आमच्या कॉलनीमध्ये गोरख नरोडे (पुर्ण नाव माहित नाही) रा. प्रसादनगर ता. राहुरी हा नेहेमी आमच्या येथील महादेव मंदीर येथील गार्डन परिसरात त्याचे मित्रांसोबत येवुन दारु पित असतो त्यावेळेस मी व आमच्या कॉलनीमधील मुलांनी त्यांना येथे दारु पिऊ नका असे समजावुन सांगितले होते.
२९ मे रोजी रात्री मी व माझा मित्र चिन्मय दत्तात्रय नगरे, सुमित सिध्दार्थ सोजवळ असे आदिनाथ वसाहतीतील जयश्री किराणा दुकानाचे समोर उभा असताना तेथे गोरख नरोडे हा दारुचे नशेत आमचे जवळ आला व तो मला म्हणाला की कॉलनी तुमच्या बापाची आहे का? मी दारू प्यायला येथे बसेल नाहीतर काहीपण करेन असे म्हणून त्याने त्याच्या हातातील कडाच्या सह्याय्याने माझ्या तोंडावर जोराचा फटक मारला माझे तोंडाचे वरील ओठास दुखापत झाल्याने माझ्या सोबत असलेले माझे वरील मित्र यांनी मोटार सायकलवर बसुन मातोश्री क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले. कल्पक धावडे याच्या तोंडाचे वरील ओठाला दुखापत झाली असून त्याच्या फिर्यादीवरून गोरख नरवडे(रा.प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी) याच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत