वंचित बहुजन आघाडी उमेदवार उत्कर्षा रूपवतेंना संघर्ष समितीचा जाहिर पाठिंबा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वंचित बहुजन आघाडी उमेदवार उत्कर्षा रूपवतेंना संघर्ष समितीचा जाहिर पाठिंबा

  श्रीरामपूर (प्रतिनिधी) गेली बेचाळीस वर्षांपासूनचा जिल्हा विभाजन प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. मात्र आजी-माजी खासदारांनी जिल्हा विभाजन ब...

 श्रीरामपूर (प्रतिनिधी)



गेली बेचाळीस वर्षांपासूनचा जिल्हा विभाजन प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. मात्र आजी-माजी खासदारांनी जिल्हा विभाजन बरोबर अनेक सामाजिक प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी प्रयत्न केले नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकरांनी सुशिक्षित आणि अभ्यासू असलेल्या उत्कर्षाताई रूपवते यांना उमेदवारी दिल्याने श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे.

प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले, वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा विभाजन प्रश्नांची पार्श्वभूमी गांभीऱ्याने समजावून घेतली. दरम्यान श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीच्या पाठिंबा पत्राचा स्वीकार केला. मोठया मताधिक्याने उत्कर्षाताई रूपवते विजयी होण्यासाठी संघर्ष समिती सक्रिय होणार असल्याचा शब्द देखील राजेंद्र लांडगे यांनी यावेळी दिला.

  याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन संघर्ष समिती युवा समन्वयक राहुल देशमुख संजय शेजूळ अभिजित बोर्डे अनिस पठाण दिपक क्षीरसागर पांडुरंग चिंधे सतीश करपे सचिन घोडेस्वार सोन्या घोडेस्वार प्रतीक राजुळे सचिन मकासरे आदीं कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत