राहुरी फॅक्टरी येथील किराणा दुकान मालक व कामगाराकडून दुकानातच काम करणाऱ्या विवाहित महिलेची छेडछाड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील किराणा दुकान मालक व कामगाराकडून दुकानातच काम करणाऱ्या विवाहित महिलेची छेडछाड

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गलगत असलेल्या एका किराणा दुकानाच्या मालकासह एका कामगाराने याच किराणा दुकानात क...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गलगत असलेल्या एका किराणा दुकानाच्या मालकासह एका कामगाराने याच किराणा दुकानात काम करणाऱ्या एका विवाहित महिलेची छेडछाड केल्याने या त्रासाला कंटाळून सदर महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकारामुळे राहुरी फॅक्टरी परिसरात एकच चर्चेला उधाण आले आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गालगत सदर किराणा दुकानात एक विवाहित महिला अनेक दिवसांपासून काम करते सदर महिला काम करत असताना किराणा दुकानाचा मालक व किराणा दुकानातील एक कामगार तिच्याशी वारंवार अंगलगट करत होते.याबाबत सदर महिलेने अनेक वेळा विरोध केला मात्र यादोघांचे कारनामे सुरूच होते. दरम्यान या त्रासाला कंटाळून सदर विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून तिच्यावर राहुरी फॅक्टरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे.


 सदर महिलेने याबाबत माध्यमांना मुलाखत दिली असून त्यात म्हटले आहे की, सदर किराणा दुकानाचा मालक व एक कामगार मी काम करत असताना माझ्याजवळ येऊन नको त्या ठिकाणी हात लावून सातत्याने अंगलगट करत असत.


सदर किराणा मालकाचे अनेक कारणामे यापूर्वीही उजेडात आले आहे .मात्र राजकीय हस्तक्षेप करून प्रकरणावर पडदा टाकण्यात येत होता. या महिलेने कुठलीही तक्रार करू नाही म्हणून पुन्हा एकदा राजकीय दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबाकडून होत आहे या किराणा दुकानातील कामगाराने यापूर्वीही याच ठिकाणी काम करणाऱ्या महिलेशी असेच कृत्य केल्याने सदर महिलेच्या पतीने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली होती.

सदर किराणा दुकान मालक व कामगार यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई कारावी अशी मागणी सदर पीडित कुटुंबानी 'आवाज जनतेशी' बोलताना केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत