किराणा दुकान मालक व कामगाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्याचा प्रयत्न करणारी महिला आज राहुरी पोलिसांना जबाब देणार! प्रकरण रफादफा होणार की कारवाई? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

किराणा दुकान मालक व कामगाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्याचा प्रयत्न करणारी महिला आज राहुरी पोलिसांना जबाब देणार! प्रकरण रफादफा होणार की कारवाई?

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील किराणा दुकान मालक व कामगाराकडून होत असलेल्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथील किराणा दुकान मालक व कामगाराकडून होत असलेल्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवाहित कामगार महिलेचा आज राहुरी पोलीस जबाब घेणार असून या जबाबानंतर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी येथील एका किराणा दुकानात काम करणाऱ्या महिलेने किराणा दुकान मालक व एका कामगाराच्या छेडछाडीचा त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

 सदर महिलेवर राहुरी फॅक्टरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान याबाबत सदर रुग्णालयाने वैद्यकीय मेमो  राहुरी पोलिसांना पाठविला होता. त्यानुसार काल बुधवारी राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी सदर हॉस्पिटल मध्ये येऊन महिलेचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला परंतु सदर महिलेच्या नाकाला नळी असल्यामुळे व तब्येत साथ देत नसल्याने जबाब देण्यास अडचण निर्माण झाल्याने पोलीस जबाब घेऊ शकले नाही. त्यामुळे आज गुरुवारी जबाब नोंदविला जाईल असे राहुरी फॅक्टरी बीटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी 'आवाज जनतेशी' बोलताना सांगितले. पीडित महिला पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकी काय सांगणार व त्यानुसार पोलीस आपली कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत