शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करणार!!- उत्कर्षा रूपवते - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करणार!!- उत्कर्षा रूपवते

कोपरगाव प्रतिनिधी  शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मतदार राजाने मला खासदार म्हणून निवडून दिल्यास मी मतदारसंघातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व...

कोपरगाव प्रतिनिधी



 शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मतदार राजाने मला खासदार म्हणून निवडून दिल्यास मी मतदारसंघातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करणार असे वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा प्रेमानंद रूपवते यांनी १० मे रोजी कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.


येत्या १३ मे रोजी राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून याच पार्श्वभूमीवर वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी कोपरगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की भारतीय संविधानामध्ये अभिप्रेत समाज निर्मितीची प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेल तसेच माझ्या मतदारसंघातील अन्नदाता शेतकरी राजा परिपूर्ण होण्यासाठी संसदेत मी आवाज उठवत शेतमालाला हमीभाव व नवनवीन शेत जोडधंदे उभारण्यासाठी प्रयत्न करणार तसेच महिलांना समृद्ध करण्यासाठी, मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था बळकटीसाठी, मतदारसंघातील युवक युवतींना मतदारसंघातच हवा तो रोजगार मिळावा याकरिता बहुराष्ट्रीय कंपन्या मतदारसंघात आणण्यासाठी प्रयत्न करेल तसेच अत्याधुनिक शिक्षण नोकरी व रोजगार मार्गदर्शन केंद्र सुरू करेल, बंद पडणाऱ्या सरकारी शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करेल, समाजातील मागास घटकांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी करणार तसेच मतदारसंघात पर्यटनाला मोठा वाव असून त्या पर्यटन वाढीसाठी योग्य त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करत जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करत मतदारसंघाची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते या उद्देशाने मतदार संघातील सर्व तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करत पर्यटन वाढीसाठी चालना देणार.तसेच मतदारसंघातील सर्वच गाव खेड्यामधील प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा उभी करत त्यातून गावचा सर्वांगीण विकास करेल तसेच गावातील पथदिवे हायमॅक्स यांचे योग्य नियोजन करत गाव तिथे व्यायाम शाळा व ग्रंथालय उभे करत तसेच गावात पक्के रस्ते गावचे सर्व स्ट्रीट लाईट व घरातील लाईट सौरऊर्जेवर कसे चालतील यासाठी वेगळे प्रकल्प राबवले जातील तसेच मोबाईल नेटवर्क कव्हरेज वाढवण्यासाठी फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी कोपरगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे आदी सह वंचित बहुजन आघाडीतील जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत