पानेगाव (वार्ताहर) मोदींच्या सभेत फलक दाखविणारे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांचा नुकताच पानेगांव (ता. नेवासे) शिवस्मारक येथे मा...
पानेगाव (वार्ताहर)
मोदींच्या सभेत फलक दाखविणारे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांचा नुकताच पानेगांव (ता. नेवासे) शिवस्मारक येथे माजी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले, उपसरपंच दत्तात्रय घोलप,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तसेच ग्रामस्थांचा वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी आघाव यांनी नगर येथील पंतप्रधान मोदींच्या सभेमध्ये दिल्लीचे आदर्श मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेल मध्ये टाकले असून निषेध म्हणून जेल का जवाब वोट से फलक दाखवून निषेध व्यक्त केला. त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. आघाव यांनी सत्कारला उत्तर देताना सांगितले की,
ज्या पद्धतीने केंद्रातील मोदी,शहा सरकारची राजवट चालू आहे ती अगदी मोगल आणि इंग्रज राजवटीला देखील लाजवील अशी आहे संविधान पायदळी तुडविले जात आहे जो त्यांच्या चुका दाखवेल त्यांच्या विरोधात बोलेल त्याला सरळ जेलमध्ये डामले जात आहे दिल्ली हे राज्य एक आदर्श पद्धतीने अरविंद केजरीवाल यांचे सरकार चालवते देशात कुठेही नाही अशा पद्धतीने तेथे राज्यकारभार चालू आहे अगदी रयतेचे राज्य तेथे आहे. देशात नाही तर जगात आदर्श घेण्यासारखं तिथे राज्यकारभार चालू आहे तेथील शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था एवढी छान आहे की ते पाहण्यासाठी अमेरिका, फ्रान्स ,जपान इत्यादी देश विदेशातील प्रतिष्ठित राज्यकर्ते तेथे येऊन पाहतात आणि त्या अशा राज्याच्या उच्चशिक्षित अशा मुख्यमंत्र्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही विचार न करता जेलमध्ये डामलेय हे कुठेतरी विचार करायला लावण्यात आहे चिड आणणार आहे तसेच आपण पाहतोय हे सरकार म्हणते अर्थव्यवस्था सुधारली आहे .सुधारली आहे ती फक्त आदानी अंबानीची यांच्यासारख्या मूठभर उद्योगपतींची आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे दुधाचे, कांद्याचे ,सोयाबीनचे, कापसाचे पडलेले बाजार भाव खताचे औषधांचे, गॅस, पेट्रोल, डिझेल वाढलेले प्रचंड भाव या बाबत मोदी शहा बोलायला तयार नाही. आणि हे सर्व करण्याची यांच्यामध्ये हिम्मत का होते तर ते फक्त त्यांचा असा समाज आहे की जनता ही भित्रि आहे आणि त्यांच्या समज दूर करण्यासाठी आणि जनतेला निर्भय करण्यासाठी मी व माझ्या क्रांतिकारी सहकार्याने निर्णय घेतला की पंतप्रधानाच्या समोरासमोर हा संदेश द्यायचा आणि आम्ही घुसलो नगर मधील मोदींच्या सभेमध्ये आणि त्यांचे भाषण चालू असताना आम्ही नेलेला फलक त्यांना दाखवला त्यावर लिहिलेले होते जेल का जवाब वोट से देंगे आणि क्रांतिकारी अरविंद केजरीवालांचा जेल मधला फोटो जनता तुमच्या दडपशाहीला तुमच्या हुकूमशाहीला भिक घालणार नाही तुमच्या हुकुमशाहीचे उत्तर लोकशाहीने देण्यात आम्ही तयार आहोत यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी सत्कारला वेळी विशद करुन तेथील अनुभव सांगितले.
यावेळी पानेगांवचे माजी सरपंच बाळासाहेब जंगले, डॉ काकडे, अनिल जंगले, मच्छिंद्र जंगले, गोरक्षनाथ जंगले, सतिश जंगले, नानासाहेब जंगले,पाराजी विटनोर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत