तांभेरेच्या संत महिपती विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तांभेरेच्या संत महिपती विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

  राहुरी(प्रतिनिधी) तालुक्यातील तांभेरे येथील संत महिपती विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयातून वैष्णवी अण्णासाहेब ...

 राहुरी(प्रतिनिधी)



तालुक्यातील तांभेरे येथील संत महिपती विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयातून वैष्णवी अण्णासाहेब गागरे ही विद्यार्थिनी ९२.६०% गुण मिळवून प्रथम आली आहे.

      याबाबत माहिती अशी की इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे तालुक्यातील तांभेरे येथील संत महिपती विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीत १८ प्रथम श्रेणीत २६ द्वितीय श्रेणीत ६ तरपास श्रेणी १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. विद्यालयातील कुमारी वैष्णवी अण्णासाहेब गागरे या विद्यार्थिनीने ९२.६० टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळाला त्याचबरोबर श्रद्धा लक्ष्मीकांत मुसमाडे या विद्यार्थिनीने ८८.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच आरती वेनुनाथ गागरे या विद्यार्थी ने ८५ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांना श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राधिकृत अधिकारी दीपक पराये प्रशासन अधिकारी ए.बी. पारखे  सहाय्यक गीताराम चोथे विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शिंदे वर्गशिक्षक सचिन मोरे, नंदकुमार दिघे, गोरक्षनाथ धामोरे, नितीन घोलप, रवींद्र उंबरकर, वैशाली खंडागळे, मीनाक्षी गागरे, मीना दंडवते, शारदा इंगळे, गणेश विघे, शंतनु गोलांडे, अशोक पवार, विजय नरोडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत