पोहेगाव बुद्रुक नंबर 2 विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली .. औताडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पोहेगाव बुद्रुक नंबर 2 विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली .. औताडे

कोपरगाव (वार्ताहर) अहमदनगर जिल्ह्यात सहकाराची चळवळ प्रथम पोहेगावात उभी राहिली. सहकाराचे महामेरू सहकार महर्षी  गणपतराव दादा  औताडे पाटील यांन...

कोपरगाव (वार्ताहर)



अहमदनगर जिल्ह्यात सहकाराची चळवळ प्रथम पोहेगावात उभी राहिली. सहकाराचे महामेरू सहकार महर्षी  गणपतराव दादा  औताडे पाटील यांनी प्रथम पोहेगाव बुद्रुक नंबर एक सोसायटी स्थापन केली.सावकारी पाशातून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी सन 1969 साली स्व. चांगदेवराव औताडे यांनी पोहेगाव बुद्रुक नंबर दोन विकास सोसायटीची स्थापना करून शेतकरी सभासदांना न्याय दिला. आज रोजी संस्थेची विकासाकडे वाटचाल असून पोहेगांव बुद्रुक नंबर दोन विकास सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे यांनी दिली. 

संस्थेचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या दुरदृष्टी नेतृत्वामुळे व मार्गदर्शनामुळे संस्थेने 69 व्यापारी गाळ्यांची निर्मिती केली. संस्थेतील सभासदांच्या बेरोजगार तरुणांसाठी यामुळे रोजगार उभा राहिला संस्थेचा दिवसेंदिवस प्रगतीचा आलेख वाढत आहे. संस्थेने वसुलीसाठी केलेल्या कामकाजाची माहिती घेत वसुलास पात्र असलेल्या सभासदांचे व संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व संचालक मंडळाचे अभिनंदन केले ‌.



संस्थेमध्ये 233 सभासद असून 110 कर्जदार सभासदांनी अहमदनगर जिल्हा बँकेकडून 1 कोटी 98 लाख पर्यंत  कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड 30 /6/2024 अखेर बँक पातळीवर सभासदांनी पूर्ण केली.याकामी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे, उपाध्यक्ष अशोक वाके,संचालक सुनिल बोठे,अनिल औताडे,  दिलीप  औताडे,  संजय  औताडे ,कैलास औताडे ,अनिल औताडे, सुनिल  हाडके ,सौ.सिमाताई  औताडे,सौ.यमुनाबाई  लांडगे,सोमनाथ सोनवणे,नितीन भालेराव , सचिव गोरक्षनाथ फटांगरे यांनी विशेष प्रयत्न केले.जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी अविनाश काटे, वसुली अधिकारी शाखाधिकारीअशोक लोहकरे,  बँक इन्स्पेक्टर  सुनील चौधरी यांचे वसुली काळात विशेष सहकार्य लाभले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे यांनी सांगितले.वेळेत कर्ज फेड केल्यामुळे संस्थेच्या सभासदांना केंद्र व राज्य शासनाकडून व्याज दारात सवलत मिळणार असल्याची माहिती देत संस्थेने शंभर टक्के वसूली दिलेल्या सभासदांचे आभार व्यक्त करून त्यांनी केलेल्या व्याजाचा भरणा

त्यांच्या बचत खात्यात  जमा केल्याचे सचिव गोरक्षनाथ फटांगरे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत