राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर येथे जनरल स्टोअरची भिंत फोडून मोबाईल, एलसीडी व रक्कम रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपीस राहुरी न्यायालया...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर येथे जनरल स्टोअरची भिंत फोडून मोबाईल, एलसीडी व रक्कम रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपीस राहुरी न्यायालयाने ३४ दिवस कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कणगर येथील गणेश बाबासाहेब जाधव यांचे गौरव जनरल स्टोअर्सची भिंत फोडून आरोपी भालचंद्र उर्फ भालू भास्कर दिवे याने ३७ हजार ८०० रुपये किंमतीचे मोबाईल, एलसीडी व रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत न्यायालयात खटला सुरू असताना सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातील विशेष सरकारी वकील सविता गांधले-ठाणगे यांनी याबाबत काम पाहिले असून राहुरी न्यायालयाच्या ३ नंबर कोर्टाचे न्यायाधीश श्री.मयुरसिंग गौतम यांनी युक्तिवाद ऐकून आरोपी भालचंद्र उर्फ भालू भास्कर दिवे यास ३४ दिवस कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा शिक्षा सुनावली सुनावली आहे.दंड न भरल्यास आणखी १० दिवसाचा कारावास वाढविण्याची शिक्षेत नोंद करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत