राहुरी(वेबटिम):- अहमदनगर जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीची बुलंद तोफ देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मादी उपनगराध्यक्ष राहुरी तालुक्यातील झुंजार नेते श...
राहुरी(वेबटिम):-
अहमदनगर जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीची बुलंद तोफ देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मादी उपनगराध्यक्ष राहुरी तालुक्यातील झुंजार नेते श्रीरामपूर तालुका विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय भाऊसाहेब शंकर पगारे यांची शिवसेना शिंदे गटाच्या अनुसूचित जाती विभागाच्या उत्तर महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड केली असल्याची घोषणा अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी मुंबई येथे केली .
काल मुंबई येथे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे भवन मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती यावेळी महाराष्ट्र राज्यातल्या विविध पदाधिकाऱ्याच्या निवडी घोषित केल्या .
याप्रसंगी श्री भाऊसाहेब पगारे यांची उत्तर महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा प्रवक्ते उपनेते डॉक्टर राजू वाघमारे यांनी भाऊसाहेब पगारे यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करून त्यांच्या पदाची घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी भाऊसाहेब पगारे यांच्या निवडीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून राजन ब्राह्मणे, किशोर वाघमारे अनिल पलघडमल रमेश पलघडमल,प्रतिक खरात, लखन वाघमारे एडवोकेट पूजाताई सोनवणे आकाश गोडगे आदिंसह अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मुंबई येथे उपस्थित होते.
यावेळी श्री भाऊसाहेब पगारे यांच्या निवडीने अहमदनगर जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी राहणार असून त्यांच्या निवडीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष अनुसूचित जाती विभाग भक्कमपनाने नामदार एकनाथराव शिंदे यांच्या पाठीशी येणाऱ्या विधानसभेला व विविध निवडणुकांमध्ये खंबीरपणाने उभा राहणार असले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी भाऊसाहेब पगारे यांच्या निवडीच्या शुभेच्छा देताना म्हणाले.
भाऊसाहेब पगारे यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये त्यांचा अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक आदी प्रमुख जिल्ह्यामध्ये चांगला जनसंपर्क असून उत्तर महाराष्ट्र राज्य मध्ये एक अनुसूचित जाती विभागाची व बौद्ध समाजाची ताकद भक्कमपनाने उभी करून पक्ष वाढीसाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करत भाऊसाहेब पगारे यांची निवड करण्यात आली.
भाऊसाहेब पगारे अहमदनगर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तसेच विविध गणपती मंडळाचे अध्यक्ष असे प्रमुख पद भूषवल्यामुळे गाव तेथे शाखा या अभियानातून त्यांचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे, नगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथापक्ष निरीक्षक दादा भुसे आदींनी अभिनंदन करून भावी कार्याला शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत