गणेगाव(प्रवीण कोबरणे) विद्यार्थ्यांना लोकशाहीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा, विद्यार्थ्यांमधून भविष्यात सक्षम नेतृत्व उदयास यावे, यास...
गणेगाव(प्रवीण कोबरणे)
विद्यार्थ्यांना लोकशाहीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा, विद्यार्थ्यांमधून भविष्यात सक्षम नेतृत्व उदयास यावे, यासाठी गणेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध खात्यांचेही वाटप करण्यात आले असून, त्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या माध्यमातून शाळेचा कारभार खुद्द विद्यार्थीच करतील.
आजच्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याची भावी पिढी तयार होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना नेतृत्व करण्याचे कौशल्य विकसित होणे गरजेचे असते. तसेच बालवयातच लोकशाही मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये होणे अपेक्षित असते. त्यातूनच गणेगाव येथे विद्यार्थी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. शाळेने विविध खाती निर्माण करून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. लोकशाहीचे शिक्षण प्रत्यक्ष कृतीने समजण्यासाठी निवडणुकीचे सर्व निकष समोर ठेवून मंत्री निवडण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावण्यात आली.
प्रथमतः मुख्याध्यापक श्रीम्.बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक कशी घ्यायची,त्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल हे सर्व समजून सांगितल्यानंतर उमेदवारी साठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज भरले. त्यानंतर 2 दिवसांचा अवधी अर्ज माघारी साठी होता.काही विद्यार्यानी अर्ज माघारी घेतले.राहिलेल्या सर्व उमेदवारांसाठी चिन्हे देण्यात आली होती. प्रचारासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला होता या काळात प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराचे चिन्ह घेऊन प्रचार प्रमुखांच्या बरोबर प्रत्येक वर्गात जाऊन सभा घेत होते. मैदानावर, शालेय परिसरात जाऊन सर्व उमेदवार आपापल्या परीने विद्यार्थी मतदारांना जागरूक राहून मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. भविष्यात मी तुमच्यासाठी काय काय काम करेन? याची आश्वासक यादी सर्व विद्यार्थ्यांना सांगत होते. आपापल्या निवडणुकीच्या चिन्हाबरोबर प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी मुलांची मने तर जिंकली.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी केली होती.मतदान अधिकारी म्हणून पूजा नालकर आणि शुभांगी शेटे यांनी अनुक्रमे मतदार यादी प्रमाणे विद्यार्थ्यांची ओळखपत्रे पाहून,ओळख पटवून सही घेऊन बोटाला शाई लाऊन मतदान कक्षाकडे पाठवत होते.विद्यार्थी मतपत्रिका पाहून आपल्या पसंदी च्या उमेदवाराला मते देऊन मतपत्रिका मतदान पेटीत घडी घालून टाकत होते.अशाप्रकारे सर्व मतदारांनी मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
आज झालेल्या मतदानामध्ये विशेष असं कि निवडून दिलेले सर्व उमेदवार आपल्या पदासाठी योग्य आहे. म्हणजेच विद्यार्थी मतदार अतिशय विचारी व चाणाक्ष आहे ह्याचं वयात जर त्यांची निर्णय, निरीक्षण क्षमता जर चांगली आहे तर आदर्श गाव गणेगाव ची भावी पिढी गणेगाव च्या नावलौकिकात नक्कीच भर टाकेल
_शिक्षकांनी मतमोजणी करून विजयी उमेदवार घोषित केले.या निवडणुकीत_ मुख्यमंत्रीपदी-पूजा नालकर, शिक्षण मंत्री- शौर्य कोबरने,शालेय शिस्त मंत्री-स्वरा कोबरणे, आरोग्य मंत्री-ज्ञानेश्वरी नालकर,क्रिडामंत्री-शिवतेज कोबरणे,पर्यावरण मंत्री-तन्मय पावसे,स्वच्छ्ता मंत्री-गीतांजली कोबरणे निवडून आली.
निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला व आनंद साजरा केला. शेवटी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मंत्र्यांचे गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापिका श्रीम.सरिता बोर्डे सहशिक्षिका श्रीमती वंदना वाघचौरे व शिक्षक श्री.सुनिल गुंजाळ यांनी अभिनंदन केले.
निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन शाळेतील शिक्षकांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत