राहुरी(वेबटीम) धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान व परिस्पर्श फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक १६ जून रोजी दुपारी ३ वाजता दहावी व...
राहुरी(वेबटीम)
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान व परिस्पर्श फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक १६ जून रोजी दुपारी ३ वाजता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे.
शहरातील नगर मनमाड मार्गावरील विठ्ठला लॉन्स येथे अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ शेटे यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त कष्टम ऑफिसर भागीनाथ शेटे, त्याचप्रमाणे तहसीलदार नामदेव पाटील , पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, समर्थ कॉलेज सुपा येथील संस्थापक अध्यक्ष कैलास गाडीलकर, मुख्याध्यापिका मीनाक्षी सोनकर आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे .
तरी या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान, राहुरी व परिस्पर्श फाउंडेशन, राहुरी यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत