मतदार शिक्षक मग लोकप्रतिनिधीही शिक्षकचं हवा ना! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मतदार शिक्षक मग लोकप्रतिनिधीही शिक्षकचं हवा ना!

   शिक्षक मतदार संघ वस्तुस्थिती नगर :  वेबटीम।                                  नाशिक शिक्षक मतदार संघात होऊ घातलेल्या निवडणुकीत शिक्षक नसल...

  शिक्षक मतदार संघ वस्तुस्थिती


नगर :  वेबटीम।       
                          नाशिक शिक्षक मतदार संघात होऊ घातलेल्या निवडणुकीत शिक्षक नसलेल्या राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी गर्दी केलेली दिसते . मतदार शिक्षक आणि उमेदवार शिक्षक नसलेले, असा इथला  झालेला आहे. राजकीय पक्षांची अधिकृत उमेदवारी घेऊनही ते आपल्याला शिक्षकांच्या टीडीएफ या आघाडीचा पाठिंबा असल्याचा व तो  दाखविण्याचा आटापिटा,  केविलवाना प्रयत्न करत आहेत . हे केवळ राजकीय पक्षांची उमेदवारी घेऊन निवडून येण्याची कुठलीही शक्यता नसल्याने होत आहे . टीडीएफ ने आज पर्यंत कधीही राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारला पाठिंबा दिलेला नाही उलट आपल्या उमेदवारास राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविलेला आहे हा टीडीएफ चा इतिहास आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे विश्वस्त एडवोकेट संदीप गुळवे, मालेगाव चे आरडी निकम शिरपूरचे निशांत रंधे व अहमदनगरचे भाऊसाहेब कचरे यांनी टीडीएफ कडे उमेदवारी मिळविण्यासाठी शिर्डी येथे मुलाखती दिलेला होत्या. त्यापैकी अहमदनगरचे प्राध्यापक *भाऊसाहेब कचरे* *यांना टीडीएफने अधिकृत उमेदवरी दिलेली आहे .पुढे आमदार किशोर दराडे यांनी शिवसेना शिंदे गट व एडवोकेट संदीप गुळवे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची अधिकृत उमेदवारी मिळविलेली आहे . निशांत रंधे यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेले आहे* . *ही वस्तुस्थिती असताना  आता यांचा टीडीएफ या आघाडीशी कुठलाही संबंध नाही परंतु दिवसेंदिवस आपण शिक्षक नसल्याने शिक्षकांच्या या मतदारसंघात विजयापासून लांब जात आहोत हे दिसून येत असल्याने त्यांच्या संस्थेतील त्यांचे कर्मचारी मार्फत टीडीएफचेच आहेत असा प्रयत्न करत आहेत. वास्तविक एकदा  राजकीय पक्षांची उमेदवारी मिळाल्यानंतर शिक्षक मतदारांमध्ये जाऊन शिक्षकांच्या प्रश्नांविषयी ,त्यांच्या अडचणी विषयी चर्चा करणे व त्याप्रमाणे प्रचार करणे आवश्यक आहे. परंतु यांचे कर्मचारी फक्त शिक्षक मतदारांची घरे शोधत असून यांना परत गेल्या सहा वर्षां प्रमाणे मतदारांना भेटवस्तू देण्याचा प्रयत्न आहे याचाच सर्वत्र बोलबाला दिसून येत आहे.

2005 पूर्वीचे शिक्षक बांधव जुनी पेन्शन मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात लढा लढत आहेत .तेथे माननीय सर्वोच्च न्यायालय सरकारकडे तुम्ही पेन्शन देणार असाल तर तशी लेखी  मागत आहे परंतु विद्यमान सरकारला ते द्यायचंच नसल्याने नुसती चालढकल चाललेली आहे .मग आता यांचे उमेदवार निवडून आले तर या शिक्षकांना पेन्शन कशी मिळेल? कारण या अधिकृत उमेदवाराला त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरणाविरोधात भूमिकाच घेता येणार नाही. तरीही हे मात्र आपल्या आश्वासनात आम्ही जुनी पेन्शन योजना मिळवून देऊ असे आश्वासित करत आहेत हे उघड उघड शिक्षकांना फसविण्याचा प्रकार आहे. शिक्षकांना सेवा शाश्वती व निवृत्तीनंतर पेन्शन  ही टीडीएफनेच मिळवून दिलेली होती व टीडीएफ गेलेली पेन्शन मिळवून देईल याची आता सर्वांना खात्री झालेली आहे. विनाअनुदान , शिक्षणाचे खाजगीकरण, कंपनीकरण, व्यावसायिकरण याला विरोध हाच टीडीएफ चा पाया आहे.सर्वांना मोफत शिक्षण यासाठीच टीडीएफ ची स्थापना झालेली आहे . या सर्वांसाठीच टीडीएफ सभागृहामध्ये व सभागृह बाहेरही काम करत आहे.

शिक्षक नसलेले हे राजकीय पक्षांचे उमेदवार म्हणूनच टीडीएफ सी आपला संबंध असल्याचे दाखवीत आहेत.खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहेत परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे.

एडवोकेट संदीप गुळवे यांचा इगतपुरी  मतदार संघ आदिवासींसाठी राखीव आहे, त्यामुळे त्यांना तेथे आमदार होण्यासाठी अडचणी आहेत, आमदार किशोर दराडे यांच्या येवला मतदार संघात त्यांचे पुतणे कुणाल दराडे यांना उमेदवारी करायची आहे. कोपरगावचे कोल्हे यांना आपल्या मतदारसंघावरील आपल्या घराण्याचा दावा कायम ठेवून अतिरिक्त आमदारकी मिळवायची आहे आणि हे सर्व शिक्षक मतदारांनी ओळखलेले आहे, हा मतदारसंघ शिक्षकांचा आहे व शिक्षकांचा राहील, असा ठाम निर्धार आता शिक्षक मतदारांनी केलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत