राहुरी(प्रतिनिधी) घराकडे येणारे टॉयलेटचे पाणि बंद केल्याने आरोपींनी दोघा पती पत्नीला शिवीगाळ दमदाटी करत लोखंडी पाईप, लाकडी दांडा व लाथा बु...
राहुरी(प्रतिनिधी)
घराकडे येणारे टॉयलेटचे पाणि बंद केल्याने आरोपींनी दोघा पती पत्नीला शिवीगाळ दमदाटी करत लोखंडी पाईप, लाकडी दांडा व लाथा बुक्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालूक्यातील मालूंजे खुर्द येथे घडली आहे.
नवनाथ धोंडीभाउ कणसे, रा. मालूंजे खुर्द, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, नवनाथ कणसे यांच्या घराकडे येणारे टॉयलेटचे पाणी बंद केल्याने आरोपींनी सायंकाळी ६.४० वाजे दरम्यान नवनाथ कणसे यांच्या आई वडीलांना शिवीगाळ धमदाटी करत लोखंडी पाईप, लाकडी दांडा व लाथा बुक्यांनी मारहाण केली. ठाण्यातनवनाथ कणसे हे आई वडीलांना वाचविण्यासाठी गेले असता आरोपी म्हणाले कि, तुझा कसा काटा काढायचा, ते पाहतो, तसेच छेडछाडीची केस करण्याची व जिवे मारण्याचीधमकी दिली. या मारहाणीत नवनाथ कणसे यांच्या आईच्या गळ्यांतील मंगळसुत्र तुटुन गहाळ झाले.
घटनेनंतर नवनाथ धोंडीभाउ कणसे यांनी राहुरी पोलिस फिर्याद दिली. त्यानूसार आरोपी अविनाश आण्णासाहेब कणसे, आण्णासाहेब रंगनाथ कणसे, सुभद्रा आण्णासाहेब कणसे, अविनाश यांची पत्नी (नाव माहीत नाही), सर्व रा. मालुंजे खुर्द, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेतील महिलेस बेदम मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून राहुरी पोलिसानी दखल पात्र गुन्हा नोंद करून आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे पीडित कुटुंबाने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत