कोपरगाव(प्रतिनिधी) बस स्थानकसमोर मागील भांडणाच्या कारणावरून दोघांना लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक १७ जून...
कोपरगाव(प्रतिनिधी)
बस स्थानकसमोर मागील भांडणाच्या कारणावरून दोघांना लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक १७ जून रोजी दुपारी घडली.याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस स्थानक परिसरात पायल फूट वेअरच्या रोडला नयन संजय मेहरे(वय-२७), रा.गांधीनगर व त्याच्या मित्रास मागील भांडणाच्या कारणावरून आरोपी आझर शेख, राजू डगळे, इरफान शेख, फौजल सय्यद व इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.याबाबत शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकोन्स्टेबल डी. आर.तिकोने हे करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत