राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी शहरातील विठ्ठला लॉन्स येथे खा.निलेश लंके यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी शहरातील विठ्ठला लॉन्स येथे खा.निलेश लंके यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. युवा नेते राजुभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान व परिस्पर्श फाउंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात निवेदक अनिल येवले यांनी राहुरी फॅक्टरी येथे प्रा.अजित येवले यांच्या माध्यमातून इंग्लिश स्पिकिंग कोर्सची बॅच सुरू होणार असल्याचे उद्घोषणा करत असताना खा.लंके यांनी निवेदक अनिल येवले यांना मध्येच थांबवत इंग्लिश बोलायचा क्लास, मग पण ऍडमिशन घ्या ,असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
माजी खा.सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक दरम्यान निलेश लंके यांच्या इंग्रजी बोलण्याबाबतचा मुद्दा पुढे आणला होता.त्याच अनुषंगाने लंके यांनी मिश्किल टिपणी केली अन सर्वांना ते लक्षात आल्याने हास्याचे फवारे उडाले.
या कार्यक्रमात विद्यार्थी व पालक यांनी खा. लंके यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी त्यांच्या भोवती गराडा केला होता खासदार निलेश लंके यांना काल रविवारी पारनेर तालुक्यातील भाळवणी अहमदनगर शहर व परिसरात अनेक कार्यक्रम होते ते कार्यक्रम आटपून खासदार लंके हे नगर मनमाड वरील ट्रॅफिकचा सामना करत राहुरी येथील विठ्ठला लॉन्स येथे तब्बल तीन तासांनी उशिरा पोहचले तरीही मात्र लंके यांच्या प्रतीक्षेत विद्यार्थी पालक व हितचिंतक बसून होते.खा. लंके यांची एन्ट्री होताच उपस्थितांनी आनंदाने स्वागत केले.गौरव सोहळा कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता खा.लंके पुण्यातील चाकण मध्ये एका विवाहासाठी रवाना झाले.
गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी वह्या पुस्तकांवाचून वंचित राहतात त्यामुळे सत्काराचा जो खर्च होतो त्याबदल्यात वह्या पुस्तके व इतर शालेय उपयोगी साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी यापुढे हार व बुके न आणता वह्या पुस्तके आणावे असे आवाहन खा.लंके यांनी राहुरीकरांना केले.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त कस्टम अधिकारी भागीनाथ शेटे, मुख्याध्यापीका मीनाक्षी सोनकर, संभाजीनगरचे मच्छिंद्र देवकर,प्रियाली मुसमाडे, नानासाहेब जुंधारे, प्रभाकर म्हसे, पोपटराव पोटे, शंभू बाबा गोसावी, अर्जुन म्हसे, पारनेरचे उपनगराध्यक्ष अर्जुन भालेकर, बबलू रोहोकले,सुनील कोकरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप आढाव, राहुल तमनर, संदीप थोपटे, गणेश खुळे, नितीन कदम, विजय उंडे, डॉ. म्हस्के, शरद डुकरे, जालिंदर कानडे, राधु जाधव, गणेश खिलारी, उमेश खिलारी, नारायण घाडगे, हरिभाऊ झडे ,अनिल येवले, संदीप कोठुळे, अभिजीत आहेर, प्रशांत मुसमाडे,मनोज खुळे, आदिंसह धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठान व परिस्पर्श फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत