५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? याचा खुलासा नगरपालिकेने जनतेला करावा........ माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? याचा खुलासा नगरपालिकेने जनतेला करावा........ माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव(वेबटीम)  कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील ५ नंबर साठवण५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? याचा खुलासा नगरपालिक...

कोपरगाव(वेबटीम)



 कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील ५ नंबर साठवण५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? याचा खुलासा नगरपालिकेने जनतेला करावा असे  प्रतिपादन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले आहे.


 तलावाच्या चारी बाजूला काँक्रिटीकरणाचे भिंत उभी केली. परंतु तळामध्ये मातीची भर व प्लास्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेत आहात. याबाबत काँक्रिटीकरण तळात का केले नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने दिला पाहिजे. 

दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या आत येत आहे. याचा अर्थ लिकेजेस / पर्क्युलेशन आहे. जर पाणी आत येत असेल तर निश्चित ५ नंबर चे तळे पूर्ण भरल्यानंतर नंतर पाण्याच्या दाबाने बाहेर पण परकुलेट होऊ शकतं. 

            तळ्याच्या खालच्या भागात काही ठिकाणी मातीची भर टाकली, त्यावर वाळू/बारीक क्रश आर्टिफिशल खडी टाकली व त्या खडीवर प्लास्टिकचा कागद टाकून वर त्यावर परत मातीचा मोठा थर दिलाय. तर काही भागांमध्ये बारीक खडीमुळे कागद फाटेल म्हणून काही भागांमध्ये बारीक खडी/वाळू  न टाकता पूर्ण मातीचाच लेअर दिलेला दिसतोय. 

तसेच पाणी दुसऱ्या तळ्यामधून या तळ्यात खालून कुठून येतं ते बंद करणं गरजेचं होतं तसे न करताच पोकलेन मशीन व ट्रॅक्टरने ते पाणी झाकून देऊन त्यावर काम चालू केलेले आहे. आधीच कोपरगावकर गढूळ व अस्वच्छ पाण्यासाठी व ५ दिवसाआड आठवड्यातून एकदा,  १५ दिवसातून एकदा तर २५ दिवसातून एकदाच पाणी असं त्रास या जनतेने कोपरगावच्या शहरातील सर्वांनी भोगलेला आहे , भोगत आहे. 

      खालून जर मातीचा पाण्यामुळे  गाळ झालेला आहे , तर त्याचं कॉम्पॅक्शन होऊ शकणार नाही आणि मग तसाच कागद आणि नुसती माती वर कॉम्पेक्षण न करता . अशा पद्धतीने माती पक्की होईल का. तसेच जो प्लास्टिकचा कागद टाकला आहे त्याचे जॉईंट बरोबर जोडलेत का आणि तळ्याच्या सर्व चारी कडेच्या बाजूला तो कागद आणि भिंत यातली गॅप बुजली का चांगल्या प्रकारे .कशाप्रकारे काम केले याचा पण ऑडिट होणे गरजेचे आहे. अन्यथा हे तळे झाल्यानंतर जर लिकेज राहिले मोठ्या प्रमाणात तर जनतेला परत पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

       तळाला हार्ड रॉक होता काही ठिकाणी कडक मुरुम ही होता. यासाठी काँक्रिटीकरणच खालच्या तळाला करणे गरजेचे होते असे न करता कागद टाकायचा हे कोणत्या आधारे नगरपालिकेने ठरवले. 

कारण यामध्ये मत्स्य व्यवसाय ही नगरपालिका करायला देते आणि जर त्यात खेकडे असले तर ते खेकडे मातीतून तो प्लास्टिकचा कागद सहज  कुरतोडतील व यामुळे पाणी पूर्वीप्रमाणे इतरस्त जायची भीती आहे.

          तरी नगरपालिकेने व जनतेने तिथं जाऊन अजून सुद्धा बघू शकता की पाणी कसं पर्कुलेट होतंय आणि तळातील काम कागद व माती व बॉर्डर भिंतींच्या आतला कागद ते भिंत कसं बंद करणार आहेत . जॉईंट करणार आहे यावर लक्ष देऊन याबाबत या जनतेच्या मनातील शंका निरसन कराव्यात. परत परत निधी मिळत नसतो आधीच खूप वर्ष जनतेला पाण्या वाचून खूप हाल झालेली आहे.

             हे नवीन तळ्याचे काम होते म्हणून माती व प्लास्टिक चा कागद न वापरता काँक्रिटीकरण जर केले असते तर पाणी लिकेज झाले नसते व कॅनल मधून तळ्यात आलेला गाळ हा काढता आला असता , परंतु खाली जर माती टाकली तर भविष्यात तो गाळ काढणार कसा.

तरी तातडीने यावर योग्य तो खुलासा व कारवाई व्हावी ही नगरपालिकेला विनंती......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत