राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या पाथरे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. गंगुबाई रंगनाथ...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या पाथरे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. गंगुबाई रंगनाथ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पाथरे येथील तत्कालीन सरपंच मनिषा गावडे यांनी राजीनामा दिल्यानंतर हि निवडणुक प्रक्रिया पार पडली. आज गुरूवारी सकाळी ग्रामपंचायत ककार्यालयात निवडणूक निर्णयक अधिकारी रोहिणी आघाव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी गंगुबाई जाधव यांचा एकमेव उमेद्वारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी आघाव यांनी सरपंच पदी जाधव यांची बिनविरोध निवड घोषित केली. त्यास ग्रामसेवक सुरेश डोंगरे यांनी सहाय्य केले. प्रसंगी गावच्या सर्वांगीण विकासासाठी गट तट विसरून विकास काम करण्यासाठी कायम तत्पर राहू असे यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांनी सांगितले. निवड प्रक्रियेत सदस्य निता घारकर, मनिषा जाधव, श्रीधर जाधव, सचिन काळे, सतिश पठारे, हिराबाई टेकाळे, मनिषा गावडे आदि होते. तर दौलत जाधव, शांतीलाल टेकाळे, नारायण टेकाळे, राजेंद्र घारकर, नारायण जाधव, कांतीलाल जाधव, गिताराम घारकर, सिताराम घारकर, काशिनाथ घारकर, पांडुरंग जाधव, श्रीकांत जाधव, रणछोडदास जाधव,बाबासाहेब जाधव,चंद्रकांत जाधव, विजय जाधव, रवींद्र जाधव, धर्मा जाधव, निखिल जाधव, शरद गावडे, ज्ञानेश्वर जाधव, ओंकार जाधव,हर्षल कोठाळे, राहुल जाधव, माऊली जाधव, अर्जुन गांगुर्डे ,शिवाजी लोखंडे, शनेश्वर जाधव, पाडुरंग जाधव, रंगनाथ जाधव,भास्कर गावडे,ज्ञानेश्वर टेकाळे, संभाजी निमसे आदि उपस्थित होते. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पो.हे.काॅ. दिपक फुंदे, दिगंबर सोनटक्के यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत