राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- उद्या जगभरात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटच्या ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
उद्या जगभरात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटच्या हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या शुक्रवार दि.२१ जुन २०२४ रोजी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती योग प्रशिक्षक किशोर थोरात यांनी दिली आहे.
गेल्या सात वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्हा पतंजली योग समिती व साई आदर्श मल्टिस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग शिबीर पार पडल्यानंतर अखंडपणे हा स्थायी योग वर्ग चालू आहे. दररोज नियमितपणे पहाटे ५ ते ६.३० यावेळेत योगसाधना साई आदर्शच्या हॉलमध्ये चालू असून दरवर्षी २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस या स्थायी योग वर्गाकडून साजरा केला जातो.
एक निरोगी जिवनशैली आत्मसात करण्यासाठी योगसाधनेशिवाय पर्याय नाही आणि हिच योगसाधना शिकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने साई आदर्शच्या हॉलमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन योगगुरू किशोर थोरात यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत