राहुरी फॅक्टरी(वेबटीम) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष संदेश पाटोळे यांच्या संकल्पनेतून देवळाली प्रवरा ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष संदेश पाटोळे यांच्या संकल्पनेतून देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी येथील विविध शाळांत यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल जयश्री कॉन्फरन्स हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, मनसे कामगार सेनेचे संकेत जरे, देसवंडी गावचे मनसेचे लोकनियुक्त सरपंच नितीन कल्हापुरे यादी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुरी फॅक्टरीचे मनसे शहराध्यक्ष विजय पेरणे सर यांनी केले यावेळी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल, नूतन माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा न्यू इंग्लिश स्कूल वाणी सेंट्रल स्कूल,या शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंतनु नालकर यांनी केले तर आभार मनविसे शहराध्यक्ष संदेश पाटोळे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी मनसे उपशहर अध्यक्ष प्रमोद विधाटे , प्रमोद जाधव,राजू आडगळे ,संदेश गायकवाड,अजित येवले सर ,श्रीकांत पाटोळे , राहुल कडू, आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत