देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. बिबट्याचे पाळीव जनाव...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. बिबट्याचे पाळीव जनावरांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले. कदम वस्ती, कडू वस्ती, मुसमाडे वस्ती, वाकन रस्ता यासह विवीध भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन होते.आंबी स्टोअर भागात बिबट्याचा वावर वाढला असून एक शेळी बिबट्याने फस्त केली आहे. वनविभागाने तातडीने ठिकठिकाणी पिंजरे उभारावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केली आहे.
देवळाली प्रवरातील वाड्या वस्त्यांवर आता तर भरदिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे. मागील आठवड्यातच माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांचे वस्तीवर रात्री लाईटच्या प्रकाशात निवांत ऐटीत बिबट्या फिरताना व पाळीव कुत्रे घराच्या ओट्यावरून उचलुन नेताना सिसी टिव्ही कॅमेरात कैद झाला. त्याच्याच दुसरे दिवशी हाकेच्या अंतरावरील कडु वस्तीवरील सोन्याबापू कडू यांची कालवड बिबट्याने आपली शिकार केली.
शेजारीच संजय अशोकराव कदम व माजी उपनगराध्यक्ष अनंतराव कदम यांचा हिरवागार उस तसेच शेजारी मोठा पाझर तलाव व तिथे दाट झाडी पिण्यास पाणी असले कारणाने संजय कदम यांना व माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम,चेतन कदम,बापु कडु, गणेश कडु शेजारील अनेक शेतकऱ्यांना आपल्या उसाच्या शेतात अनेक वेळा बिबट्याचे व छोटे पिल्लाचे दर्शन झाले आहे. राहुरी फॅक्टरी-देवळाली प्रवरा मधल्या रोडवरील भालेकर वस्तीवर बिबट्याने गेल्या महिन्यात भर दिवसा दोन शेळ्या फस्त केल्या. तर काल आंबी स्टोअर येथील मधूकर जंगम यांची शेळी बिबट्याने फस्त केली.
देवळाली प्रवरा परिसरात ज्या भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन होते किंबहुना पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत, अशा ठिकाणी वनविभागाने पिंजरे तसेच आवश्यक उपाययोजना कराव्यात त्यासाठी आम्ही नक्कीच वनविभागाला सहकार्य करू. वरवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली मृत पावल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुदैवाने देवळाली प्रवरा परिसरात मानवी जातींवर अद्याप बिबट्याने हल्ले केले नाही. परंतू वनविभागाने बेफिकीर न राहता ठिकठिकाणी पिंजरे उभारावेत असे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत