पानेगांव (वार्ताहर) नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील खेडलेपरमानंद,शिरेगांव,पानेगांव,करजगांव येथील घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले यावे...
पानेगांव (वार्ताहर)
नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील खेडलेपरमानंद,शिरेगांव,पानेगांव,करजगांव येथील घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार शंकरराव गडाख यांचे जल्लोषात फटाक्यांच्या आताषबाजीने स्वागत करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने आमदार शंकरराव गडाख यांनी गावोगावी
शेतकरी ,कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान विविध विषयांवर विचारमंथन होत आहे. तालुक्यात मंत्रीपदाचा कार्यकाळात झालेली विकासकामे जनतेपुढे मांडत असून द्वेषाच्या भूमिका घेवून भाजप सरकारने आनेक मंजूर कामांना स्थगिती दिल्याने तालुका विकास कामांपासून वंचित राहिला आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिल्याने तालुका दूध संघाला टाळे ठोकण्यात आले, मुळा शैक्षणिक
संस्थेमागे चौकशीचा ससेमिरा लागला, मुळा बँक, मुळा साखर कारखान्या समोर अडचणी निर्माण करण्यात आल्या. मात्र त्या दबावाला गडाख घाबरले नाही, उलट सामोरे गेले. तालुक्यातील मंजूर केलेली ७० कोर्टीची विजेची कामे, सुमारे ९० कोटींच्या रस्त्यांच्या कामाला स्थगिती मिळाली, तसेच नवीन निधीतही डावलेले गेले, पण गडाखांनी एकनिष्ठ राहत थेट जनतेच्या कोर्टात धाव घेतली आहे. राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार राज्यात येणार असून आमदार गडाखांचा रुपाने पुन्हा नेवासे तालुक्याला लाल दिवा मिळणार असल्याचा भावना शेतकऱ्यांनी बोलावून दाखविल्या.
आमदार गडांखाचा भेटीदरम्यान शेतकऱ्यांची तालुक्यात गंभीर झालेल्या विजेच्या समस्या बरोबरच दुध भाव मागील वर्षी झालेल्या पाऊसाने कपाशी सोयाबीन नुकसान भरपाईची पिक विमा मोठ्या प्रमाणावर शेतकरी वंचित राहिले असून रस्त्यावर उतरूआंदोलनची भूमिका घेतल्याशिवाय भाजप सरकार जाग येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी चार हि गावात आमदार गडाख यांना बैठकीत सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत