कोपरगाव(वेबटीम) भारतीय सण-उत्सवातील विविधतेने नटलेली महान संस्कृती आपण मोठ्या उत्साहाने आणि आवडीने जोपासना करतो. याच आत्मियतेने आपण सर्वांनी...
कोपरगाव(वेबटीम)
भारतीय सण-उत्सवातील विविधतेने नटलेली महान संस्कृती आपण मोठ्या उत्साहाने आणि आवडीने जोपासना करतो. याच आत्मियतेने आपण सर्वांनी संस्कृती सोबत पर्यावरणाची जोपासणा करण्याचे आवाहन वनरक्षक शितल कोटमे यांनी केले आहे.
सूर्यतेज संस्था कोपरगांव आयोजित कोपरगांव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्यात नावजलेल्या या स्पर्धेचा उपक्रम ११ वर्षापासून सुरु आहे. कृष्णाई बँक्वेट हाॅल येथे सन २०२३ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून वनरक्षक शितल कोटमे, अनुलोमचे मुंबई-कोकण विभागप्रमुख रविंद्र पाटील,विसपुते सराफचे संचालक यश विसपुते,अग्रवाल चहा कंपनीचे संचालक नारायण अग्रवाल,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, आदर्श शिक्षक डी. एन. खैरनार, सूर्यतेज सल्लागार समितीच्या सौ. लताताई भामरे, अनिल अमृतकर,मतीन दारूवाला,पुष्पांजली शाॅपी संचालिका पुनम अमृतकर,बाळासाहेब कदम, हास्य क्लबचे सी. आर. बजाज उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांना सन्मानचिन्ह झाडाचे रोप देवून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी अनुलोम मुंबई-कोकण विभागाचे रविंद्र पाटील यांनी सूर्यतेजच्या माध्यमातून समुहाने एकत्र येऊन २४ वर्षातील सामाजिक,सांस्कृतिक कार्य कौतुकास्पद आहे. सणांची महान परंपरा सांगत विविध सण- उत्सवाचे महत्त्व विषद केले.
या स्पर्धेला विसपुते सराफ, राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड, अग्रवाल चहा कंपनी, पुष्पांजली शाॅपी, कापसे पैठणी, सुशांत आर्ट्स अॅण्ड पब्लिसिटी, पांडे स्विटस् यांचे विशेष सहकार्य लाभले.
पारंपरिक ,निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र, सामाजिक , व्यंग चित्र, भौमितिक आकार या विषयी कलाप्रकारात आयोजन केलेल्या स्पर्धेत ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यातील प्रथम क्रमांकास कापसे पैठणी, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि झाडाचे रोप तर गुणवत्ता रांगोळीस पुष्पांजली भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि झाडाचे रोप भेट देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचा शुभारंभ भारतमाता प्रतिमा पूजनाने मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नोंदणी अधिकारी तसेच परिक्षण समिती प्रमुख कल्पना गिते,ऐश्वर्या बिडवे,अनंत गोडसे, महेश थोरात, आदिती पाटील,वासंती गोंजारे, वर्षा जाधव,दिलीप गायकवाड, अॅड. महेश भिडे यांचेसह सर्व सूर्यतेज संस्थेचे सदस्य आणि दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन वैष्णवी गंडे यांनी केले.राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.सूर्यतेजच्या आयोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत