राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- आज भारतभर आंतरराष्ट्रीय योगा दिन सर्वत्र साजरा होत असून राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
आज भारतभर आंतरराष्ट्रीय योगा दिन सर्वत्र साजरा होत असून राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय येथे देखील द आर्ट ऑफ लिविंग या संस्थेकडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले याचाच एक भाग म्हणून राहुल फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींना योग प्रशिक्षण देण्यात आले.
या योग प्रशिक्षणाचे प्रशिक्षक डॉ.संदीप कोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली साई आदर्श मल्टीस्टेटचे जनरल मॅनेजर व योग प्रशिक्षक सचिन खडके यांनी दिले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ आवारे, श्री राशिनकर,श्री. सोनवणे, श्री. जाधव केके,श्री.देशमुख, श्री. जाधव, सौ. खाडे, सौ.डांगे, सौ. शिंदे, सौ. साबळे,सौ.सुपनर आदींसह विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत