कोपरगाव मानवाला निरोगी जीवनशैलीसाठी योगाचा नियमित सराव करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रेरणा देतो. शारीरिक व्यायाम न करणाऱ्यांना...
कोपरगाव
मानवाला निरोगी जीवनशैलीसाठी योगाचा नियमित सराव करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रेरणा देतो. शारीरिक व्यायाम न करणाऱ्यांना प्रोत्साहन देतो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव चिंता आणि शारीरिक मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी नागरिकांनी योगाभ्यास करावा. असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सुहास जगताप यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात केले.
कोपरगाव शहरात नियमित योग साधना करणारे योग साधकांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून आजच्या दहाव्या योग दिनापर्यंत एकत्रित घेऊन त्यांनी योग दिवस साजरा केला.
खासदार सूर्यभान वहाडणे गोदावरी घाटावर योग संस्थेच्या वतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याधिकारी श्री सुहास जगताप तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप, पतसंस्था फेडरेशनचे माननीय काकासाहेब कोयटे श्री व सौ एडवोकेट जयंत व स्मिता जोशी, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे , व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, दीपक साळुंके , सतीश गुजराती, श्री व सो राजेंद्र वरखडे , श्री व सौ सुरेश धामणे, श्री व सौ पुष्पाताई जगताप , श्री व सौ महापुरे , श्री व सौ मांढरे योग संस्थेचे अध्यक्ष योग शिक्षक दत्ता पुंडे , विमल पुंडे एडवोकेट सौरभ पुंडे, आदी मान्यवर व मोठ्या प्रमाणात योग साधक साधिका उपस्थित होत्या. गेल्या 25 वर्षापासून कोपरगावच्या नागरिकांचे आरोग्य निरोगी व उत्तम राखण्यासाठी योग संस्थेच्या दत्ता पुंडे व विमल पुंडे दांपत्याचा कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिता भुतडा, सुमित्रा कुलकर्णी, सारिका भावसार, स्वाती अमृतकर , कमल नरोडे, वैशाली दिवेकर, पल्लवी भगत, गिरिषा कदम, कविता शहा आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका अर्चना लाड यांनी केले तर योगशिक्षिका विमल पुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत