पानेगांव (वार्ताहर) तालुक्यातील पानेगांव ग्रामपंचायत कार्यालयात येथे अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा दिन...
पानेगांव (वार्ताहर)
तालुक्यातील पानेगांव ग्रामपंचायत कार्यालयात येथे अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पानेगांव लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले/आंबेकर माजी सरपंच मच्छिंद्र जंगले, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, तंटामुक्ती उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले, अंगणवाडी सेविका गुडधे मॅडम, जंगले मॅडम,बाळासाहेब वाघमारे, गणेश जंगले, शिवाजी ठोसर शुभम जंगले, गणेश गायकवाड बाबासाहेब शेंडगे आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत