देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कदम वस्तीवर शेतात जखमी अवस्थेत दिसून आलेल्या उद मांजराला तरुणांनी जीवनदान देऊ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कदम वस्तीवर शेतात जखमी अवस्थेत दिसून आलेल्या उद मांजराला तरुणांनी जीवनदान देऊन पुढील उपचारासाठी वनविभागाकडे शनिवारी(दि.१५) रोजी स्वाधीन केले आहे.
देवळाली प्रवरातचे माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम यांच्या शेतात तरुणांना जखमी अवस्थेत दिसून आल्यानंतर त्यास सावलीत नेऊन पाणी पाजले. यावेळी माजी नगरसेवक नानासाहेब बर्डे, गिरीश कदम, अजय दिवे, आकाश बर्डे, मंगेश बर्डे, अमोल गायकवाड, सतीश डोळस, यश साळवे, अजित जाधव, साई बर्डे यांनी यावेळी मदतकार्य केले.
त्यानंतर वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सतीश जाधव, समाधान चव्हाण, राजू घुगे , ताराचंद गायकवाड यांनी जखमी उद मांजराला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी वन विभाग रोपवाटिकेत नेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत