राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील चिरायू हॉस्पिटल व दातांचा दवाखानान्याय दातांची अती कठीण अशी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील चिरायू हॉस्पिटल व दातांचा दवाखानान्याय दातांची अती कठीण अशी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली.
'Immediate Functional Implant Loading' या अत्याधुनिक शस्त्रक्रिये मध्ये रुग्णाला फक्त 5 दिवसांमध्ये स्क्रू द्वारे कायमस्वरूपी चे पक्के दात लावण्यात येतात.
साधारणपणे याच कामासाठी सध्या होत असलेल्या पारंपरिक पद्धतीनं काम केल्यास रुग्णाला पक्के दात मिळण्यासाठी 3 ते 6 महिने वेळ लागतो.परंतु तेच काम फक्त 5 दिवसांमध्ये पूर्ण करण्यासाठी ही अत्याधुनिक शास्त्रक्रिया करण्यात आली..कमी दिवसांमध्ये उच्च प्रतीचे आणि कायम स्वरुपी चे दात रुग्णाच्या शरीरात इम्प्लांट द्वारे बसवण्यात आले.
रुग्णांस पॅरालीसिस व उच्च रक्तदाबाचा त्रास असताना सुद्धा अतिशय कठीण अशा 7 तास चाललेल्या शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्यात आल्यामुळे हॉस्पिटल च्या संपूर्ण टीमचे विविध माध्यमातून कौतुक होत आहे.
सदर शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी चिरायू हॉस्पिटल च्या दंत रोग तज्ज्ञ डॉ प्राची हर्षद चोरडिया,डॉ प्रणय कुमार ठाकूर, मीनाक्षी त्रिभुवन, ज्योती कदम, दानिश बागबान आदींचे परिश्रम व योगदान लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत