कोपरगाव(प्रतिनिधी) दि 14/06/2024 Dysp शिरीष वमने यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मनाई वस्ती येथ...
कोपरगाव(प्रतिनिधी)
दि 14/06/2024 Dysp शिरीष वमने यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मनाई वस्ती येथे नारंदी नदीच्या कडेला एक इसम बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टी दारू तयार करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी त्यांचे पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम दोन दगडाचे चूल मांडून त्यावर लोखंडी टिपाड लावून त्यामधून गावठी हातभट्टी दारू एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये काढीत असताना दिसून आला म्हणून सदर इसमास जागीच पकडून तेथे असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करून एक लाख 4 हजार रुपयाचा मुद्देमालाचा नाश केलेला आहे व कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी नामे विलास भगवान सोनवणे राहणार मनाई वस्ती तालुका कोपरगाव याचे विरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 277/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम फ क ड ई कायद्यान्वये फिर्याद दिली आहे.सदरची कारवाईमुळे अवैध्य धंद्यावाल्याचे दाबे दणाणले आहेत
सदरची कारवाई माननीय राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री वैभव कलूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर dysp शिरीष वमने शिर्डी Pi प्रदीप देशमुख यांनी यांचे मार्गदर्शनाखाली HC इरफान शेख अशोक शिंदे HC तमनर pnश्याम जाधव pcज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत