राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे संगणक टंकलेखन परीक्षेत गोंधळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे संगणक टंकलेखन परीक्षेत गोंधळ

  राहुरी(वेबटीम) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यात संगणक टंकलेखन परीक्षा (GCC TBC)दिनांक 10 जुलै त...

 राहुरी(वेबटीम)



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यात संगणक टंकलेखन परीक्षा (GCC TBC)दिनांक 10 जुलै ते 14 जुलै महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून सदर परीक्षेसाठी तालुकास्तरावर परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत.राहुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी डॉ अण्णासाहेब शिंदे  कॉलेज ऑफ एग्रीकल्चर  इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी , महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे परीक्षा सुरू आहेत.


 परंतु परीक्षा केंद्रासाठी वापरत असलेल्या कॉम्प्युटर लॅब मध्ये आणि कमतरता असून विद्यार्थ्यांना परीक्षेस  खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता एका विद्यार्थ्यास परिषदेसाठी एका टॉपिक मध्ये पाच ते सहा वेळेस कॉम्प्युटर बंद होत आहे, कॉम्प्युटर बंद पडल्यानंतर वेळेत लॉगिन न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा झालेले नाही,, मुलांना घरी काढून दिले त्यामुळे  त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले,.


काही विद्यार्थ्यांचे लॉगिन होण्यास उशीर होत असल्याने सकाळी नऊची परीक्षा काही विद्यार्थ्यांनी तीन दिवसापासून संध्याकाळी सहा वाजता दिलेली आहे .त्यामुळे पालक वर्गांची सुद्धा याबाबत नाराजी दिसून येत असून पालकांनी परीक्षा परिषद व शिक्षण विभागावर ताशेरे ओढले आहेत व याबाबत शिक्षणाधिकारी व परिषद यांच्याकडे  तक्रारी देखील दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.


 सदर परीक्षेसाठी प्रथमच यावर्षी सर्व अधिकार परीक्षा केंद्रांना देण्यात आलेले आहेत. पुणे येथील एक कंपनी गेली 10 वर्ष पासून ही परीक्षा घेते परंतु टेंडर संपूनही सॉफ्टवेअर परिपूर्ण नसूनही या कंपनीस परीक्षेचे काम का दिले जाते असा प्रश्न निर्माण होत आहे.


सदर परीक्षेचे सॉफ्टवेअर वापराबाबत कोणतेही ट्रेनिंग आयटी टीचर न दिल्याने त्यांनाही या बाबतची परिपूर्ण माहिती नाही तरी सदर परीक्षा पद्धतीत बदल होवून परीक्षा सुरळीत व्हावी अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत