कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव नगरपरिषदेची बांधकामाबाबत परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम उत्खनन करून लगतच्या इमारतीचा काही भाग ढासळल्याने जीवि...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव नगरपरिषदेची बांधकामाबाबत परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम उत्खनन करून लगतच्या इमारतीचा काही भाग ढासळल्याने जीवित व वित्त हानीची दाट शक्यता झाल्याने शहरातील ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेत रचना सहायक म्हणून कार्यरत असलेले किरण जोशी यांनी शहर पोलीसात फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हंटले की, कोपरगाव नगरपरिषद हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सर्वे नं.१७७५ मध्ये प्रदीप बद्रीनारायण मुंदडा रा. कोपरगाव याने कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव यांची बांधकामाच्या संबधी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे बांधकाम करत असल्याने व सदरचे बेकायदेशीर बांधकामाचे खोदाईमुळे दिनांक १२/०६/२०२४ रोजी दुपारी १२.५५ वाजता श्री. मच्छिंद्र जगन्नाथ देवकर रा. कोपरगाव यांच्या इमारतीचा उत्तरेकडील काही भाग ढासाळल्याने सदर ठिकाणी जिवीत तसेच वित्त हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहर पोलिसात प्रदीप बद्रीनारायण मुंदडा रा. कोपरगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत