राहुरी(प्रतिनिधी) राहुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र सूर्यकांत शिंदे यांची नुकत्याच महाराष्ट्र शासनात...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र सूर्यकांत शिंदे यांची नुकत्याच महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पदोन्नतीमध्ये त्यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. गेल्या 14 वर्षांपासून शिंदे पोलीस दलात सेवा देत आहेत.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व कर्मचारी वर्ग यांनी पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .
मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले देवेंद्र सूर्यकांत शिंदे यांनी खडतर परिश्रम घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले त्या नंतर सुरुवातीला त्यांनी बीड जिल्ह्यात मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. पण त्यांच्या वडिलांची इच्या होती कि आपल्या मुलाने पोलीस दलात सेवा द्यावी म्हणून ते मुख्यध्यापक असताना देखील एमपीएससी अभ्यास करत राहिले ,कुठल्याही प्रकारचे क्लासेस न करता स्वतः नोकरी करून अभ्यास करून २०१० मध्ये एमपीएससी मध्ये यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदी बाजी मारली. त्यानंतर पोलीस खात्यात आल्यानंतर 2011 ते 2018 पुणे शहर तसेच पुणे गुन्हे शोध पथकात काम केले यामध्ये त्यांनी अनेक उल्लेखनीय असे काम केले तसेच गुन्हे शोध पथकामध्ये असताना अनेक किचकट गुन्ह्यांची उकल त्यांनी केला 2018 ते 2023 मध्ये त्यांची बदली नाशिक ग्रामीण येथे झाली त्यामध्ये त्यांनी मालेगाव ,सटाणा, वडनेर खाकुर्डी या ठिकाणी काम पाहिले तसेच मालेगाव शहर व मालेगाव एलसीबी मध्ये देखील त्यांनी काम केलेले आहे नाशिक ग्रामीणला असताना त्यांनी वडनेर येथील खाकुर्डी येथे 26/ 11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांचे स्मृति उद्यान उभारले आहे.याठिकाणी त्यांनी 250 ऊन अधिक झाडे लावून सर्व परिसर निसर्गरम्य केला आहे . तसेच मालेगाव येथे शहर वाहतूक शाखेमध्ये काम करत असताना सहा महिन्यांमध्ये तब्बल १ कोटी 16 लाख रुपये दंड वसूल करून शासन दरबारी जमा केला होता. श्री देवेंद्र शिंदे हे एक दबंग अधिकारी म्हणून कायमच त्यांच्या कामाने चर्चेत राहिलेले आहेत.त्यानंतर 2024 मध्ये ते अहमदनगर पोलीस सेवेत रुजू झाले. 29 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. राहुरी मध्ये देखील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. श्री देवेंद्र सूर्यकांत शिंदे हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी असून गोरगरिबांना, पीडित, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात .
पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिंनदन केले जात आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत