अहमदनगर(वेबटीम) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खा.निलेश लंके यांचा आज दिल्ली येथे प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
अहमदनगर(वेबटीम)
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खा.निलेश लंके यांचा आज दिल्ली येथे प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशशेठ वाबळे यांनी सन्मान केला.
खासदार पदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच खा.लंके दिल्लीत पोहोचले वासून आज ५ जनपथ नवी दिल्ली येथे शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी अहिल्या नगर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट चे संस्थापक चेअरमन व प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेशशेठ वाबळे यांनी साई मूर्ती देऊन सन्मान केला.
तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेले नवनिर्वाचित खामुरलीधर मोहोळ यांचा फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट पुणे च्या वतीने सुरेश वाबळे व लोकसेवा मल्टीस्टेटचे अध्यक्ष नकुल कडू यांनी सन्मान केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत