भुशी डॅम दुर्घटनेतील एका मुलीला राहुरी फॅक्टरी येथील ' या' डॉक्टरांकडून जीवदान! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भुशी डॅम दुर्घटनेतील एका मुलीला राहुरी फॅक्टरी येथील ' या' डॉक्टरांकडून जीवदान!

  पुणे(वेबटीम) लोणावळा शहरात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले भुशी धरण तुडूंब भरून वाहत असल्याची बातमी येत असतानाच, ...

 पुणे(वेबटीम)



लोणावळा शहरात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले भुशी धरण तुडूंब भरून वाहत असल्याची बातमी येत असतानाच, या धरणाच्या पाण्यात पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास घडली. बुडालेल्यांमध्ये ४ ते १३ वर्षे वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच एका महिलेचा समावेश आहे.दरम्यान यातील या घटनेतील एका मुलीला राहुरी फॅक्टरी येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ.सचिन विटनोर व त्यांच्या एक डॉक्टर मित्राला वाचविण्यात यश आले.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर येथील सैय्यदनगरमधील अन्सारी कुटुंबातील काहीजण रविवारी भुशी धरणावर वर्षाविहारासाठी गेले होते. त्यावेळी  धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्याठिकाणी गेले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण १० जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले. यातील पाच जणांना पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र दुर्दैवाने ४ ते १३ वर्षे वयोगटातील तीन मुली, एक मुलगा आणि महिला पाण्यासोबत वाहून गेली आहे.


राहुरी फॅक्टरी(वैष्णवी चौक) येथील मूळचे रहिवासी व पुणे स्थित डॉ.सचिन विटनोर व त्यांचे हैदराबाद येथील मित्र डॉ.श्रीनिवास गंधारे हे आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी ट्रीपला गेले होते. एक मुलगी वाहून जात असताना डॉ.विटनोर व डॉ.गंधारे यांनी कसबस बाहेर काढले. त्या मुलीचे हार्ट बिट थांबल्याने दोघांनी तिला सीपीआर व माऊथ टू माऊथ ब्रिदिंग देऊन जीवदान दिले. डॉ.विटनोर व त्यांच्या मित्राच्या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत